बाळासाहेब थोरातांच्या बहिणीवर आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप : भाजपची फिर्याद

बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांची बहीण तसेच युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या आई दुर्गा तांबे ( Durga Tambe ) या संगमनेर नगरपालिकेच्या अध्यक्ष आहेत.
Durga Tambe
Durga TambeSarkarnama

अहमदनगर - अहमदनगर जिल्ह्यातील 9 नगरपालिकांची निवडणूक जवळ आली आहे. यात संगमनेर नगरपालिकेचा समावेश होतो. बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांची बहीण तसेच युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या आई दुर्गा तांबे ( Durga Tambe ) या संगमनेर नगरपालिकेच्या अध्यक्ष आहेत. त्यांनी संगमनेर शहरात अमरधामचे काम केले. या एका कामाचे दोनदा बिल काढल्याचा आरोप करत भाजपचे संगमनेर शहर अध्यक्ष अॅड. श्रीराम गणपुले यांनी अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे फिर्याद अर्ज काल ( ता. 2 ) दिली आहे. तर आज ( ता. 3 ) संगमनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यामुळे आता संगमनेरचे राजकीय वातावरण तापू लागले आहे. ( Balasaheb Thorat's sister accused of financial misconduct: BJP's complaint )

फिर्यादीत आरोपी म्हणून संगमनेर नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी, विद्यमान अधिकारी, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, माजी उपनगराध्यक्ष नगरसेवक दिलीप पुंड, विश्वास मुर्तडक, किशोर पवार, नितीन अभंग या नगरसेवकांचा समावेश आहे. त्यांच्यावर आर्थिक लाभासाठी गैरप्रकार, फसवणूक व खोटी कागदपत्रे केल्याचा गुन्हा दाखल करावा असे अॅड. गणपुले यांची मागणी आहे.

Durga Tambe
दुर्गा तांबे म्हणाल्या, आम्हाला निवडणुकांत रणधुमाळी करावी लागत नाही...

फिर्यादीत म्हंटले आहे की, संगमनेर नगर परिषदेने डिसेंबर 2021मध्ये दोन निविदा प्रसिद्ध केल्या. यात पहिली 24 लाख 88 हजार 442 रुपयांची व दुसरी निविदा बाळासाहेब थोरात यांच्या आमदार विकास निधीतून 9 लाख 16 हजार 66 रुपयांची होती. या दोन्ही निविदांत प्रस्ताविक केलेली कामे डिसेंबर 2019 मध्ये काढण्यात आलेल्या निविदातून पूर्ण झाली. त्याची बिलेही अदा करण्यात आली होती.

Durga Tambe
दुर्गा तांबे म्हणाल्या, बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून संगमनेरमध्ये चांगले काम होतय...

संगमनेर शहरात नव्याने नूतनीकरण करण्यात आलेल्या अमरधाम नूतनीकरण, सुशोभीकरण प्रकरणासाठी सुमारे 25 लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेचा अपहार झाला आहे. अमरधामचे काम पूर्ण झालेले असतानाही नंतर दोन निविदा काढून त्या द्वारे हा अपहार झाला. संगमनेर नगर परिषदेने अमरधाम नूतनीकरण सुशोभीकरणासाठी तीन निविदा प्रसिद्धीस दिल्या, असे फिर्यादीत म्हंटले आहे.

या प्रकारणामुळे संगमनेर शहरातील राजकारण तापू लागले आहे. कोरोना उपाय योजनांच्या नावाखाली हा गैरव्यवहार करण्यात आल्याचा भाजपचा आरोप आहे. या प्रश्नावर विरोधकांनी काही महिन्यांपूर्वी संगमनेरमध्ये आंदोलन केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com