Balasaheb Thorat : जिरवाजिरवी करू नका, एक दिवस तुमचीच चांगली जिरेल ; थोरातांचा विखेंना इशारा!

Balasaheb Thorat : माजी महसूलमंत्र्यांनी दिला, विद्यमान महसूल मत्र्यांनाच इशारा...
Balasaheb Thorat : Radhakrush Vikhe Patil
Balasaheb Thorat : Radhakrush Vikhe PatilSarkarnama

अहमदनगर : आपल्या राज्यापुढचे प्रश्न सोडवण्यापेक्षा काही सरकारमधील काही राजकारणी जिरवाजिरवीचं काम करत आहेत. मात्र लक्षात ठेवा एके दिवशी तुमचीच चांगलीच जिरणार आहे, असा सणसणीत टोला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव न घेचाच लगावला. संगमनेरमध्ये शनिवारी कांदा आणि वीज प्रश्ना घेऊन ठिय्या आंदोलन पुकारण्यात आले होते. या आंदोलनात भाग घेत थोरात यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

Balasaheb Thorat : Radhakrush Vikhe Patil
Old Pension Scheme : जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचारी आक्रमक; कोल्हापुरात पाटलांनी काढला धडकी भरवणारा मोर्चा

थोरात म्हणाले, याआधी आमचे सरकार होतेच, आमच्या वेळी शेतकऱ्यांना मदत केली जायची. मदत करताना कधीही खर्चाचा विचार केला गेला नाही. आताच्या सरकारमध्ये मात्र शेतकरी दुय्यम घटक झाला आहे. सरकार आज स्मार्ट सिटी करण्यात आणि मेट्रो बनवण्यात व्यस्त आहे. मात्र ही जी काही शहरे मोठी झाली, ती शेतकऱ्यांच्या मेहनतीमुळेच झाले, हे विसरून चालणार नाही. व्यापारी अगदी कवडीमोल भावाने कांदा खरेदी करत आहेत, अन् ते नाफेडला जाऊन उच्च भावात विकत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

ते पुढे म्हणाले, काही नेत्यांकडून नुसती जिरवाजिरवीचं राजकारणाचं उद्योग सुरू आहे. मात्र त्यांनी हे लक्षात ठेवावं की, एक दिवस त्यांचंच जिरणार आहे. अधिकाऱ्यांनीसुद्धा लक्षात ठेवावं की, सरकार आज आहे, उद्या नाही, यामुळे कायद्यानुसार, नियमानुसार कामं केली पाहिजेत. कोणाचा फोन आला म्हणून जिरवाजिरवी करू नये, इशाराच थोरात यांनी स्थानिक अधिकाऱ्यांना दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com