निळवंडेला मदत न करणारे आता पाण्याबाबत गैरसमज निर्माण करतायेत

मंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांनी विखे गटाकडून होत असलेल्या टीकेला नाव न घेता उत्तर दिले.
Balasaheb Thorat
Balasaheb ThoratSarkarnama

संगमनेर ( जि. अहमदनगर ) - सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या 2021-22 च्या गळीत हंगामाच्या सांगता समारंभ काल ( ता. 8 ) झाला. या प्रसंगी बोलताना राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांनी विखे गटाकडून होत असलेल्या टीकेला नाव न घेता उत्तर दिले. ( Balasaheb Thorat said, those who do not help Nilwande are now creating misconceptions about water )

बाळासाहेब थोरात म्हणाले, कारखान्याने कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील सर्व शेतकऱ्यांच्या उसाचे निर्विघ्नपणे गाळप केले आहे. 15 लाख 51 हजार मेट्रिक टनाचे विक्रमी गाळप झाले आहे. संगमनेर तालुक्याच्या विकासासाठी आपण सातत्याने मोठा निधी मिळवला आहे. निळवंडेला मदत न करणारे आता पाण्याबाबत गैरसमज निर्माण करत आहेत. संगमनेर तालुक्याची एक नंबरची प्रगती कायम राहील, असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.

Balasaheb Thorat
बाळासाहेब थोरात यांनी तो किस्सा सांगत केली अजित दादांची स्तुती

ते म्हणाले, की संगमनेर तालुक्यातील जनतेचे प्रेम व नेतृत्वाच्या विश्वासामुळे राज्यात मोठा सन्मान मिळत आहे. या पदाचा तालुक्याचा विकास आणि निळवंडे कालव्याच्या कामासाठी उपयोग केला आहे. कालव्यांची कामे वेगाने सुरू असून ऑक्टोबर 2022 मध्ये दुष्काळी भागात पाणी पोचवण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न आहे. मात्र, या कामात कोणतेही योगदान देणारे आता पाण्याबाबत काही अफवा पसरवीत आहेत. राज्य सरकारच्या माध्यमातून पिण्याच्या पाणी योजनेसाठी 616 कोटी रुपये, तर तलाव दुरुस्तीसाठी 32 कोटी रुपयांचा निधी मिळविला. चारही रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.

Balasaheb Thorat
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकलायं...

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ होते. व्यासपीठावर आमदार डॉ. सुधीर तांबे, कांचन थोरात, संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे, इंद्रजित थोरात, बाजीराव खेमनर, माधवराव कानवडे, लक्ष्मणराव कुटे, डॉ. जयश्री थोरात, डॉ. प्रेरणा शिंदे, रामहरी कातोरे, मधुकर नवले, हौशीराम सोनवणे, मीरा शेटे, सुनंदा जोर्वेकर, नवनाथ आरगडे, अजय फटांगरे आदी उपस्थित होते. कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी प्रास्तविक केले. नामदेव कहांडळ यांनी सूत्रसंचालन केले, तर उपाध्यक्ष संतोष हासे यांनी आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in