बाळासाहेब थोरात म्हणाले, राज ठाकरेंच्या सभेतील गर्दीचे मतांत परिवर्तन होणार नाही...

औरंगाबाद येथे थोड्याच वेळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांची सभा होणार आहे.
Balasaheb Thorat
Balasaheb ThoratSarkarnama

अहमदनगर - औरंगाबाद येथे थोड्याच वेळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांची सभा होणार आहे. या सभे संदर्भात राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. संगमनेर येथे एका कार्यक्रमानंतर उपस्थित पत्रकारां समवेत बोलताना त्यांनी आपले मत व्यक्त केले. ( Balasaheb Thorat said, there will be no change in the votes of the crowd in Raj Thackeray's meeting ... )

बाळासाहेब थोरात म्हणाले, आज आपण महाराष्ट्र दिन साजरा करत आहोत. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे ही एक चळवळ उभी राहिली होती. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना या चळवळीला यश आले. महाराष्ट्राची आतापर्यंतची वाटचाल प्रगतीच्या दिशेने झाली आहे. जे स्वप्न संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या धुरिणांनी पाहिले होते. ते स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. अजूनही खूप काम करावे लागेल ही वस्तुस्थिती आहे. सर्वसामान्यांचे जीवन सुखी-संपन्न झाले पाहिजे. नवी पिढी आणखी पुढे गेली पाहिजे. त्याकरिता आम्हा सर्वांना प्रयत्न करायचा आहे.

Balasaheb Thorat
बाळासाहेब थोरात म्हणाले, महागाईवरुन लक्ष वळविण्यासाठी हनुमान चालिसाचा वाद

ते पुढे म्हणाले की, राज्यघटनेने आपल्याला काही अधिकार दिले आहेत. काही मत मतांतरे करायला परवानगी दिली आहे. मात्र ते राज्यघटनेच्या चौकटीत राहून करायचे आहेत. दुर्दैवाने काही जण सवंग राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. माणसा-माणसात, धर्मांत भेद निर्माण करणे, त्याच्यावर राजकारण करत आहेत. राजकारण हे विकासाचे असले पाहिजे आणि धर्महा व्यक्तिगत असला पाहिजे. मात्र दुर्दैवाने राजकारण सोपे कसे करायचे मते सहजतेने कसे मिळतील. या पद्धतीने जनतेची फसवणूक केली जात आहे. जनतेत फुट पाडून मते मिळविणे ही जनतेची फसवणूक आहे. देश व राज्यातील जनतेना यात फसू नये.

Balasaheb Thorat
कोल्हापूरच्या जनतेने भाजपच्या धर्मांध राजकारणाला नाकारले... बाळासाहेब थोरात

राज ठाकरे यांच्या सभेतील गर्दी मतांत परिवर्तीत होणार नाही. महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. मताचे विभाजन, समाजाचे विभाजन करण्याचा चाललेला प्रयत्न यापेक्षा त्यांना विकासाची गरज आहे. भाषण ऐकण्यासाठी कदाचित लोक जमतील मात्र मतात त्याचे परिवर्तन होणार नाही.

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आम्ही निर्माण होऊ देणार नाही. याची काळजी पूर्णपणे प्रशासन घेईल. ही जबाबदारी प्रत्येक सुज्ञ नागरिक व नेता म्हणून मिरवतो त्याचीही आहे. कुठल्याही परिस्थितीत हे राज्य शांततेत व कायद्यानुसार चालले पाहिजे, अशी अपेक्षा मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in