बाळासाहेब थोरात म्हणाले, ते खोल नैराश्यात गेले आहेत...

आमदार राधाकृष्ण विखे पाटील ( MLA Radhakrishna Vikhe Patil ) यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात ( Revenue Minister Balasaheb Thorat ) यांचा नामोल्लेख टाळत टीका केली होती. यावर थोरात यांनी आज विखेच्या आरोपांना नामोल्लेख टाळत जोरदार प्रतिउत्तर दिले.
Revenue Minister Balasaheb Thorat
Revenue Minister Balasaheb Thorat Sarkarnama

संगमनेर ( अहमदनगर ) : अहमदनगर जिल्ह्यात विखे व थोरात हे दोन मोठी राजकीय घराणी समजली जातात. या दोन्ही घराण्यांत वाद आहेत. राज्यात भाजपकडून महाविकास आघाडीतील नेत्यांवर गैरव्यवहारांचे आरोप होत आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा नामोल्लेख टाळत टीका केली होती. यावर थोरात यांनी आज विखेच्या आरोपांना नामोल्लेख टाळत जोरदार प्रतिउत्तर दिले. Balasaheb Thorat said, he has gone into deep depression ...

नगर जिल्ह्यात महसुलमंत्री बाळासाहेब थोरात आणि माजीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची राजकीय टीका, टोलेबाजी सर्वश्रुत आहे. ते एकमेकांवर टिका करण्याची संधी कधीच सोडत नाही असे चित्र आहे. नुकतीच विखे यांनी थोरात यांना उद्देशून कोणी किती महसुल गोळा केला हे कळेल. नगर जिल्ह्यातील एक मंत्री मोठ्या घोटाळ्यात अडकणार असल्याचे वक्तव्य केले होते.

Revenue Minister Balasaheb Thorat
विखे पाटील कॉंग्रेस आघाडीसाठीच काम करीत आहेत : बाळासाहेब थोरात

थोरात म्हणाले, त्यांनी काही तरी बोलावे आणि तुम्ही उगाच त्यांच्या बोलण्याला महत्व द्यावं. माणसं नैराश्येच्या खोल गर्तेत गेल्यावर ते काय बोलतील याकडे दुर्लक्ष आम्ही करतो, तुम्हीही दुर्लक्ष करा असा टोला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी माजी मंत्री राधाकृष्ण पाटील यांना लगावला. 

Revenue Minister Balasaheb Thorat
पवार-विखे वादाला तरूणाई मैत्रीत बदलू पाहतेय...

काय म्हणाले होते विखे

श्रीरामपूर येथे केंद्राच्या योजनेनुसार वृद्ध लोकांना जीवनावश्यक साधनांचे वाटप शिबिराचे उद्धाटन आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते रविवारी ( ता. 17 ) करण्यात आले. या प्रसंगी आमदार विखेंनी पत्रकारांशी संवाद साधला. या प्रसंगी आमदार विखे यांनी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता गंभीर आरोप केले होते.

महसूल मंत्री थोरात यांनी संगमनेर येथे एका कार्यक्रमात आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव न घेता आरोप केले होते. यावर पत्रकारांनी विचारले असता विखे म्हणाले, त्यांना व काँग्रेसला राज्य सरकारमध्ये किती किंमत आहे. हे लोकांनी पाहिलेले आहे. त्यामुळे ज्यांना पक्षात व सरकारमध्ये किंमत नाही त्यांच्या वक्तव्याबद्दल मी काय बोलणार, अशी कोपरखळीही त्यांनी मारली होती.

Revenue Minister Balasaheb Thorat
विधान परिषदेसाठी बिगूल : मतदारयादीचे निकष जाहीर; मुदत संपलेले नगरसेवक हळहळले

विखे पाटील पुढे म्हणाले, संपूर्ण राज्यभरात महाविकास आघाडीच्या भ्रष्टाचाराला लोककंटाळलेले आहेत. मंत्री व दलालांचे साटेलोटे रोज समोर येत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री त्यात अडकलेला आहे. प्रकरण ज्यावेळी बाहेर येईल त्यावेळी लोकांच्या लक्षात येईल. चौकशी सुरू आहे. ते ईडी, सीबीआय वर आरोप करतील. वास्तविक पाहता या मंत्र्यांची सर्व पापे भरलेली आहेत. आपली पापे झाकण्यासाठी स्वायत्त संस्था असलेल्या ईडी, सीबीआय सारख्या संस्थांवर दोषारोप चालू आहे. कारण या संस्था बदनाम करायच्या म्हणजे आपला भ्रष्टाचार लपविता येईल, या भ्रमात मंत्र्यांनी राहू नये. हा माझा त्यांना सल्ला आहे, असे विखे पाटील यांनी सांगितले

यावर पत्रकारांनी मंत्री हा नवा आहे की जुना असे विचारले असता आमदार विखे पाटील म्हणाले, सध्या या प्रकरणावर सबुरीने घ्या म्हणजे लवकरच मंत्री नवीन आहे की जुने हे कळेल. कोणी किती 'महसूल' गोळा केला. हे आपोआप समोर येईल, असेही आमदार विखे पाटील यांनी सांगितले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com