बाळासाहेब थोरात म्हणाले, महागाईवरुन लक्ष वळविण्यासाठी हनुमान चालिसाचा वाद

राज्यात हनुमान चालिसावरून सुरू असलेल्या वादंगावर राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांनी पत्रकारांशी बोलताना महत्त्वपूर्ण वक्तव्य केले.
Balasaheb Thorat
Balasaheb Thoratsarkarnama

संगमनेर ( जि. अहमदनगर ) - राज्यात हनुमान चालिसावरून सुरू असलेल्या वादंगावर राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांनी पत्रकारांशी बोलताना महत्त्वपूर्ण वक्तव्य केले. बोलताना त्यांनी विरोधकांचे नाव न घेता टीका केली. ( Balasaheb Thorat said, Hanuman Chalisa's argument to divert attention from inflation )

बाळासाहेब थोरात म्हणाले, केंद्रातील भाजपचे सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, जीवनावश्यक वस्तूंची जीवघेणी महागाई, बेरोजगारी या सारख्या समस्यांनी जनता त्रस्त आहे. जनतेचे लक्ष या ज्वलंत मुदयांवरुन दुसरीकडे वळविण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचे काम काही लोक जाणीवपुर्वक करीत आहेत, अशी टीका मंत्री थोरात यांनी केली.

Balasaheb Thorat
बाळासाहेब थोरात म्हणाले, भाजप व एमआयएम आमच्यासाठी सारखेच...

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचे नाव न घेता मंत्री थोरात म्हणाले, की देशातील जनता महागाईने होरपळत आहे. बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. शेतकरी, कामगारांचे प्रश्‍न आहेत. केंद्र सरकार या प्रश्‍नांवर अपयशी ठरलेले आहेत. मुख्य मुद्यांवरुन जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी काही लोकांना पुढे करून भाजप राज्यातील वातावरण बिघडविण्याचे काम करीत आहेत. देशात सध्या धार्मिक राजकारण करुन जातीय तेढ निर्माण केला जात आहेत. हे अत्यंत दुर्दैवी आहे. राज्यात कायदा, सुव्यवस्था उत्तम असून प्रशासन त्यांचे काम करीत आहेत, पण वातावरण गढूळ करण्याचे काम करीत आहेत.

महाविकास आघाडी सरकार विरोधकांचे मनसुबे ओळखून आहेत, असेही मंत्री थोरात म्हणाले. सरकार भक्कम आहे आणि आम्ही सर्व जण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहोत. तसेच राज्यातील जनता सुज्ञ असून अशा प्रकारच्या षडयंत्राला बळी पडणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com