बाळासाहेब थोरात म्हणाले, भाजप व एमआयएम आमच्यासाठी सारखेच...

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे.
Balasaheb Thorat
Balasaheb ThoratSarkarnama

अहमदनगर - राज्यातील महाविकास आघाडीत सहभागी होण्याची एमआयएमने ( AIMIM ) तयारी दर्शविली आहे. त्या दृष्टीने महाविकास आघाडीत तीनही पक्षांतून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. ( Balasaheb Thorat said, BJP and MIM are the same for us ... )

बाळासाहेब थोरात म्हणाले, महाविकास आघाडीच्या आमदारांची 170 संख्या आहे. आम्ही 170 एकत्र आहोत. भक्कम आहोत. भाजपचा कोणताही नेता काहीही बोलावा आणि आम्ही त्याला उत्तरे द्यावीत असे अपेक्षित नाही. ते जेवढे प्रयत्न करतील, वेगळं बोलतीलं तेवढे आम्ही पक्के होत जाणार. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वावर आम्हाला विश्वास आहे. आम्ही एकत्रितपणे चांगलं काम करत आहोत. महाविकास आघाडी भक्कम आहे.

Balasaheb Thorat
बाळासाहेब थोरात म्हणाले, पिछेहाटीत काँग्रेस नेतृत्वाचा काही दोष नाही...

थोरात पुढे म्हणाले की, आम्हाला कोणताच कट्टरवाद मान्य नाही. कोणत्याही जाती - धर्माचा कट्टरवाद आम्हाला अपेक्षित नाही. आम्हाला सर्वधर्म समभाव अपेक्षित आहे. त्या तत्त्वज्ञानानुसार आम्ही पुढे जात आहोत. भाजपचा कट्टरवाद काय अथवा एमआयएमचा कट्टरवाद काय समान आहेत. आम्हाला कट्टरवाद नको आहे, असे मत बाळासाहेब थोरात यांनी मांडले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com