देवेंद्र फडणवीस ज्या हेलिकॉप्टरने आले त्यानेच बाळासाहेब थोरात निघून गेले

एका हेलिकॉप्टरमधून भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ), चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन शहरात आले.
Devendra Fadnavis & Balasaheb Thorat

Devendra Fadnavis & Balasaheb Thorat

Sarkarnama

अहमदनगर : अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे काल ( ता. 29 ) सकाळी लोकार्पण होते. तर सायंकाळी अहमदनगर जवळील बुऱ्हाणनगर येथे माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या मुलाचे लग्न होते. या दोन्ही कार्यक्रमानिमित्त काल अहमदनगर शहरात राजकीय नेत्यांची वर्दळ होती. अशातच एका हेलिकॉप्टरमधून भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ), चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन शहरात आले. नेमके त्या हेलिकॉप्टरने राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) मुंबईच्या दिशेने रवाना झाले. यावेळी भाजप नेते व थोरात यांची भेट झाली तसेच चर्चाही झाली. Balasaheb Thorat left by the helicopter that Devendra Fadnavis came with

अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीलचे बाळासाहेब थोरात यांनी लोकार्पण केले. त्यावेळी त्यांच्या समवेत राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख होते. या दोघांनी दुपारी कर्डिले यांच्या निवासस्थानी जाऊन अक्षय कर्डिले यांना विवाहाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर गडाख सोनईच्या दिशेने निघून गेले तर थोरात हे नगर तालुक्यातील काँग्रेसच्या बैठकीला गेले. ही बैठक संपायला सायंकाळ झाली. सायंकाळी सहा वाजता थोरात अहमदनगर पोलिस कवायत मैदान येथील हेलिपॅडवर आले.

<div class="paragraphs"><p>Devendra Fadnavis &amp; Balasaheb Thorat</p></div>
योगायोगाचे दुसरे नाव म्हणजे बाळासाहेब थोरात

त्याच वेळी एक हेलिकॉप्टर हेलिपॅडवर उतरले. त्या हेलिकॉप्टरमधून राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन उतरले. त्यांचे स्वागत करण्यासाठी माजी मंत्री राम शिंदे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी आमदार स्नेहलता कोल्हे आदी उपस्थित होते. फडणवीस यांचे लक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे गेले. ते थोरातांना तुम्ही इथे असे म्हणत थोरातांचा हात हातात घेतला. यावर थोरातांनी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय इमारत लोकार्पण व अक्षय कर्डिलेंना शुभेच्छा देऊन आलो आहे. आता याच हेलिकॉप्टरने पुन्हा निघाल्याचे सांगितले. मागून आलेल्या गिरीश महाजन यांनीही थोरातांची आस्थेने विचारपूस केली.

<div class="paragraphs"><p>Devendra Fadnavis &amp; Balasaheb Thorat</p></div>
बाळासाहेब थोरात म्हणाले, शेतकऱ्यांसमोर अहंकारी केंद्र सरकार झुकले...

भाजपचे हे नेते दिवंगत माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी व राज्यातील माजी मंत्री अनिल राठोड यांच्या घरी गेले. त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी अक्षय कर्डिले यांच्या विवाह सोहळ्याला हजेरी लावली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com