बाळासाहेब थोरात निगेटिव्ह आले : राजकीय, सामाजिक कार्यक्रम स्थगित केले

मुंबईत राज्याच्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानंतर काही मंत्री व आमदारांना कोरोनाची ( Corona ) लागण झाली.
बाळासाहेब थोरात निगेटिव्ह आले : राजकीय, सामाजिक कार्यक्रम स्थगित केले

Balasaheb Thorat

Sarkarnama

अहमदनगर : मुंबईत राज्याच्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानंतर काही मंत्री व आमदारांना कोरोनाची ( Corona ) लागण झाली. यात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांचाही समावेश होता. Balasaheb Thorat Corona negative: Political and social programs postponed

राज्यातील अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यात अहमदनगर जिल्ह्यातील थोरात यांच्यासह ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार रोहित पवार, भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचा समावेश आहे. यातील यातील काही जणांच्या उपचाराला उद्या सात दिवस पूर्ण होत असल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात बाळासाहेब थोरात कोरोना निगेटिव्ह आढळून आले आहेत.

<div class="paragraphs"><p> Balasaheb Thorat </p></div>
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार कोरोना पॅाझिटीव्ह!

या संदर्भातील माहिती त्यांनी ट्विटरवरून दिली. ट्विटमध्ये थोरात यांनी म्हटले आहे की, माझा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी सोमवारपासून माझ्या नियमित कामकाजास सुरुवात करेल. या सर्व काळात माझ्या आरोग्यासाठी आपण दिलेल्या सदिच्छा मला ऊर्जा देणाऱ्या ठरल्या.

माजी केंद्रीय मंत्री डॉ. अण्णासाहेब शिंदे व माझे वडील तीर्थरूप भाऊसाहेब थोरात यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी आयोजित केला जाणारा जयंती महोत्सव सोहळा कोविड पार्श्वभूमीवर आम्ही पुढे ढकलला आहे. शिवाय संगमनेर मध्येही पुढील सूचनेपर्यंत आम्ही राजकीय आणि सामाजिक कार्यक्रम स्थगित करत आहोत, असे त्यांनी सांगितले आहे.त्यामुळे थोरात समर्थकांत उत्साहाचे वातावरण आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in