Patan : शंभूराज देसाई भडकले; म्हणाले, कोत्या मनाच्या लोकांना ते आवडले नसावे

शिंदे गटाच्या Eknath Shinde Group कार्यकर्त्यांनी आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे Balasaheb Thackeray यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन केल्यानंतर उद्धव ठाकरे Udhav Thackeray यांच्या गटाने तेथे शुद्धीकरण केले.
Udhav Thackeray, Shambhuraj Desai
Udhav Thackeray, Shambhuraj Desaisarkarnama

सातारा : बाळासाहेब ठाकरे हे कोणा एका पक्षाचे, व्यक्तीचे नेते नव्हते ते देशाचे नेते होते. राष्ट्रपुरुष होते. त्यांच्या स्मृतीदिनी त्यांना वंदन करणे त्यांचा आशीर्वाद घेणे हा आमच्या सर्वांचा अधिकार आहे. त्यामुळे कोत्या मनाच्या लोकांना ते आवडले नसावे, अशी टीका साता-याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी विरोधकांवर केली.

शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन केल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या गटाने तेथे शुद्धीकरण केले. यावरुन मंत्री देसाई यांनी उद्धव ठाकरेंच्या गटाच्या शिवसैनिकांवर टीकेची झोड उठवली.

शंभूराज देसाई म्हणाले, 1997 कालावधीत बाळासाहेब ठाकरे हे स्वत: आमच्या दौलतनगर मरळी गावी आले होते. माझ्या वडिलांच्या जयंती दिवशी (20 नोव्हेंबर 1997) त्यांनी मला शिवसेनेत प्रवेश दिला. त्या दिवसांपासून आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने पाटण तालुक्यात तसेच सातारा जिल्ह्यात काम करीत आहे. काही काळ म्हणजेच मागचे अडीच वर्ष आम्ही हिंदुत्वाच्या विचाराने बाजूला पडला होता.

Udhav Thackeray, Shambhuraj Desai
Satara : शहराबाहेर होणार नवे कारागृह; शंभूराज देसाईंनी प्रस्ताव देण्याची केली सूचना

परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा हिंदुत्वाचा विचार ज्वलंत केला आहे. बाळासाहेबांचा विचार तळागळात पोचवत आहोत. दरम्यान शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन केल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या गटाने शुद्धीकरण केले. या प्रश्नावर शंभूराज देसाई म्हणाले, जी मंडळी कोत्या मनाची असतात. ती मंडळी असा प्रकार करतात.

Udhav Thackeray, Shambhuraj Desai
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत मोदी-शहांचा अपेक्षाभंग झालाय : शिवसेना नेत्याचे सूचक विधान

बाळासाहेब ठाकरे हे कोणा एका पक्षाचे, व्यक्तीचे नेते नव्हते ते देशाचे नेते होते. राष्ट्रपुरुष होते. त्यांच्या स्मृतीदिनी त्यांना वंदन करणे त्यांचा आशीर्वाद घेणे हा आमचा सर्वांचा अधिकार आहे. त्यामुळे कोत्या मनाच्या लोकांना ते आवडले नसावे असेही देसाईंनी नमूद केले.

Udhav Thackeray, Shambhuraj Desai
सावरकरांवर राहुल गाधींची टीका; पण सामना भाजप-सेनेत : उद्धव ठाकरेंचे एक घाव दोन तुकडे!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com