असल्या तक्रारीकडे फारसे लक्ष देत नाही : बाळासाहेब पाटील

Balasaheb Patil|Vikas Lawande| NCP : राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांची तक्रार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली आहे.
असल्या तक्रारीकडे फारसे लक्ष देत नाही : बाळासाहेब पाटील
Balasaheb Patil & Vikas LawandeSarkarnama

सातारा : मी सहकार मंत्री असून माझ्याकडे सोसायटींबाबतचे अनेक विषय येत असतात. त्यातून काहींनी तक्रारी केल्या असल्या तरी अशा तक्रारीकडे मी फारसे लक्ष देत नाही, अशी स्पष्टोक्ती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांनी राष्ट्रवादीचे (NCP) प्रवक्ते विकास लवांडे (Vikas Lawande) यांच्या तक्रारीवर दिली आहे. (Balasaheb Patil & Vikas Lawande Latest Marathi News)

Balasaheb Patil & Vikas Lawande
राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यानेच सहकारमंत्री बाळासाहेब पाटलांचे वाभाडे काढले; हटविण्याची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विलास लवांडे यांनी सहकारमंत्र्यांचे वाभाडे काढत त्यांना पदावरून हटविण्याची मागणी केली आहे. सहकार सक्षम करणारा व सहकारातील अपप्रवृत्तीला लगाम लावणारा राज्याला सहकारमंत्री अत्यावश्यक आहे. भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारा नसावा. अन्यथा सहकार बदनाम होत राहणार व जनतेचा विश्वास राहणार नाही, अशा शब्दांत विकास लवांडे यांनी मागणी केली आहे.

पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचेही ते ऐकत नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे त्यांना पदावरून हटवावे. सहकारमंत्र्याच्या या कामामुळे पक्षाचे नाव बदनाम होत असून पर्यायाने शरद पवार आणि इतर नेत्यांवर यामुळे टीका होऊ शकते, असाही इशारा त्यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.

Balasaheb Patil & Vikas Lawande
राजू शेट्टींचा पाया उखडलाय? : लोकसभेची पुढील लढत खासदार माने विरुद्ध आवाडे...

यासंदर्भात आज (ता.17 जून) सहकारमंत्री पाटीलांना विचारले असता ते म्हणाले की, मी सहकार मंत्री असल्याने माझ्याकडे अशा अनेक सोसायट्यांचे विषय येत असतात. त्यामुळे अशा प्रकारावरून कोणी तक्रार करत असेल तर त्याकडे मी फारसे लक्ष देत नाही, असे सांगून त्यांनी लवांडे यांच्या तक्रारीकडे दूर्लक्ष केले आहे.

Balasaheb Patil & Vikas Lawande
सदाभाऊंनी घेतला बिलाचा धसका...? ‘थ्री स्टार’ हॉटेलमध्ये घरगुती शिदोरीवर केली न्याहरी!

दरम्यान, लवांडे यांनी शरद पवारांना लिहिलेल्या पत्रात पाटील यांच्याविषयीचा वैयक्तिक अनुभव सांगितला आणि पाटलांची तक्रार केली. सहकार क्षेत्राला (Cooperative sector) सक्षम करणारा व सहकारातील अपप्रवृत्तीला लगाम लावणारा राज्याला सहकारमंत्री अत्यावश्यक आहे. भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारा नसावा. अन्यथा सहकार बदनाम होत राहणार व जनतेचा विश्वास राहणार नाही, अशा शब्दांत लवांडे यांनी पाटलांवर टीका करत पाटलांना पदावरून हटवा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

आपल्या महाविकास आघाडीचे सरकार येऊन २ वर्षे झाली. मात्र सहकार खात्याकडून एकही नवीन सकारात्मक पध्दतीची योजना नाही किंवा नाविन्यपूर्ण सहकार संस्था बळकटीकरणासाठी काम नाही. कोणतेही नवीन धोरण आखलेले नाही. एकीकडे केंद्रात सहकार मंत्रालय सुरू आहे. त्यावेळी सक्षमपणे आपण भाजपला तोंड देऊ शकू का, असा प्रश्न आहे. आधीच आपला पक्ष सहकारातील काही अपप्रवृतींच्या लोकांमुळे बदनाम आहे. ती मलीन प्रतिमा सुधारण्यामागे सहकार मंत्र्याकडे कोणता कृतीकार्यक्रम आहे? सहकार प्रशासनातील कामकाज व् सेवासुविधा कालबाह्य आहेत. त्याबाबत कोणताही कार्यक्रम नाही. सहकारमंत्री म्हणून पाटील राज्याला वेळ न देता केवळ सातारा-कराडला वेळ देत आहेत. त्याचा राज्याला व पक्षाला फायदा होत नाही. हे माझे निरिक्षण आहे, अशी टीकाही लवांडेंनी केली. आता याप्रकरणी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या काय प्रतिक्रिया येतात हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in