Budget Session : मी मुद्दा सोडून बोलत नाही...बाळासाहेब पाटलांनी देसाईंना सुनावले

Balasaheb Patil अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरु असून आज साकव पुलांच्या कामांचा मुद्दा राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी अधिवेशनात मांडला.
Shambhuraj Desai, Balasaheb Patil
Shambhuraj Desai, Balasaheb Patilsarkarnama

Satara News : मी मुद्दा सोडून बोलत नाही, आपण एकाच जिल्ह्यातील आहोत. कृपया बसून बोलू नका. जिल्ह्याला संरक्षण देता तसेच मलाही द्या, अशा शब्दात राष्ट्रवादीचे कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील Balasaheb Patil यांनी सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई Shambhuraj Desai यांना सुनावले.

अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरु असून आज साकव पुलांच्या कामांचा मुद्दा राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी अधिवेशनात मांडला. यावेळी त्यांनी राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री व सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना सुनावले.

साकव पुलांच्या मुद्द्यांवर बोलताना बाळासाहेब पाटील म्हणाले, पूर्वी शेतामध्ये शाळांमध्ये जाण्यासाठी लाकडाचे व लोखंडाचे साकव पूल होत होते. आताची परिस्थिती बदलली आहे. वाहतूक वाढली आहे. रुंदी कमी असल्यास वाहने जाऊ शकत नाहीत. मध्यंतरी उपमुख्यमंत्री असताना अजित पवार यांनी हे साकव स्लॅबमध्ये बांधावेत, असे सांगितले होते.

Shambhuraj Desai, Balasaheb Patil
Karad Market Yard: कराड बाजार समितीसाठी बाळासाहेब पाटील, अतुल भोसलेंचे गट एकत्र

आता जिल्हा नियोजन समितीकडे या साकव पुलांचा प्रस्ताव गेलेला आहे. त्यांची रुंदी किती लांबी किती हे सांगावे. यावेळी शंभूराज देसाईंनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बाळासाहेब पाटील यांनी त्यांना अडवत म्हणाले, शंभूराज हा कोकणातील विषय नाही. आपल्या जिल्ह्यातील विषय सांगत आहे. मी मुद्दा सोडून बोलत नाही, आपण एकाच जिल्ह्यातील आहोत.पालकमंत्री देसाई यांच्याकडून संपूर्ण जिल्ह्याला संरक्षण मिळते. तसेच मलाही संरक्षण मिळावे.

Shambhuraj Desai, Balasaheb Patil
Satara News: कास परिसरातील १५५ बांधकामे अधिकृत करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com