Koyana : धरणग्रस्तांच्या आंदोलनाचे अधिवेशनात पडसाद; तातडीने न्याय द्या : बाळासाहेब पाटलांची मागणी

Balasaheb Patil शासनाकडून लवकर निर्णय झाला नाही तर, आंदोलकांचे आक्रमकतेमुळे कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे, असेही आमदार बाळासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले.
MLA Balasaheb Patil
MLA Balasaheb Patilsarkarnama

-हेमंत पवार

Koynanagar News : धरण आणि प्रकल्पग्रस्तांचे कोयनानगर (जि.सातारा) येथे श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर Bharat Patankar यांच्या नेतृत्वाखाली २७ फेब्रुवारीपासून अहिंसक मार्गाने बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाकडे शासनाने दूर्लक्ष केल्याने कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे, असा इशारा आमदार बाळासाहेब पाटील Balasaheb Patil यांनी विधानसभेत देऊन धरणग्रस्तांना तातडीने न्याय द्यावा, अशी मागणी केली.

आमदार बाळासाहेब पाटील म्हणाले, कोयनानगर येथे १०५ टीएमसीचे धरण बांधून वीज निर्मितीसह शेतीला सिंचनासाठी पाणी पुरवठ्याचा लाभ झालेला आहे. याची महाराष्ट्रवासियांना जाणीव आहे. धरण बांधून ६२ वर्षे पूर्ण झाली आहेत. परंतू विस्थापितांचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत.

या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष व राष्ट्रीय संघटक डॉ. भारत पाटणकर यांनी १४ फेब्रुवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले आहे. त्यावर काहीही निर्णय झाला नसल्यामुळे विस्थापितांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली २७ फेब्रुवारीपासून कोयनानगर येथे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु आहे.

MLA Balasaheb Patil
Satara : अधिवेशन काळात ते कुठं असतात... शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंना डिवचले

याबाबतची माहिती शासनाला मिळालेली असूनही शासनाचा एकही प्रतिनिधी आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन त्यांचेकडून कोणतेही ठोस लेखी आश्वासन दिले गेले नाही. याचा शासनाकडून लवकर निर्णय झाला नाही तर आंदोलकांचे आक्रमकतेमुळे कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे. या आंदोलनात विशेषतः वृध्द प्रकल्पग्रस्त व महिलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. या ठिय्या आंदोलनास आज २२ दिवस पूर्ण झालेले आहेत. याचीही दखल राज्य शासनाने घेणे गरजेचे आहे.

MLA Balasaheb Patil
Balasaheb Patil News : एक मंत्री दोन-तीन खात्यांना न्याय कसा देणार ? ; माजी मंत्र्यांची शिंदे सरकारवर नाराजी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in