Karad Market Yard: कराड बाजार समितीसाठी बाळासाहेब पाटील, अतुल भोसलेंचे गट एकत्र

Karad BJP: कराड बाजार समितीत उलाढाल कोट्यवधीत गेली आहे. त्यामुळे ही बाजार समिती आपल्याच ताब्यात राहावी, यासाठी आता कऱ्हाड तालुक्यातील नेत्यांनी शड्डू ठोकले आहेत.
Atul Bhosale, Balasaheb Patil
Atul Bhosale, Balasaheb Patilsarkarnama

Karad News : कऱ्हाड शेती उत्पन्न बाजार समितीची निवडणूक तोंडावर आली आहे. सध्या मतदार यादी तयार करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. या निवडणुकीसाठी तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीपूर्वी कट्टर विरोधक असलेले माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील Balasaheb Patil व भाजपचे चिटणीस अतुल भोसले Atul Bhosale यांचे गट या वेळच्या बाजार समिती निवडणुकीसाठी एकत्र येणार आहेत. त्यांच्या गटाच्या दोन बैठकाही झाल्या असून, त्यावर शिक्कमोर्तब झाले आहे.

कऱ्हाड शेती उत्पन्न बाजार समिती ही गूळ, जनावरांच्या बाजारासाठी राज्यात प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर बाजार समितीने अन्य व्यापारही मोठ्या प्रमाणात वाढविल्याने आता उलाढाल कोट्यवधीत गेली आहे. त्यामुळे ही बाजार समिती आपल्याच ताब्यात राहावी, यासाठी आता कऱ्हाड तालुक्यातील नेत्यांनी शड्डू ठोकले आहेत.

कऱ्हाड तालुक्यातील नेते सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नेहमीच विविध राजकीय पक्ष, चिन्ह, धोरणे बाजूला ठेवत स्वतःचा गटाचे हित व भविष्यातील राजकीय संधी पाहूनच निर्णय घेत असल्याचे चित्र आहे. मध्यंतरी झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमदार पाटील आणि भोसले गट आगामी राजकीय निती आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकत्र आले आहे.

कऱ्हाड दक्षिणमध्ये अतुल भोसले यांच्यापुढे काँग्रेस हा प्रमुख अडसर आहे. त्यामुळेच भोसले गट पक्षीय धोरण, भूमिका बाजूला ठेवत आमदार बाळासाहेब पाटील गटाला जाहीरपणे मदत करणार, हे स्पष्ट आहे. बाजार समितीची निवडणूक तोंडावर आली आहे. सध्या मतदार यादी तयार करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आली आहे.

Atul Bhosale, Balasaheb Patil
Satara : पेंटिंगच्या वादावर पडदा; राजघराणे, देसाईंच्या घराण्याचे सलोख्याचे संबंध...

या निवडणुकीसाठी तालुक्यातील राजकीय घडामोडी वेगाने सुरू आहेत. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीपूर्वी कट्टर विरोधी असलेले आमदार पाटील गट व भोसले गट या वेळच्या बाजार समिती निवडणुकांसाठी एकत्र येणार आहेत. त्यासाठी त्यांच्या गटाच्या दोन बैठकाही झाल्या. त्यात शिक्कमोर्तब झाल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. त्यामुळे आता बाजार समितीची निवडणूक या वेळी चुरशीची होईल, अशी चिन्हे आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com