बाळासाहेब पाटील-उदयसिंह उंडाळकरांच्या जिल्हा बँकेतील भवितव्याचा फैसला आज

सहकारमंत्री बाळासाहेब पाटील की अॅड. उदयसिंह उंडाळकर? जिल्हा बँकेत कोणाचा झेंडा?
बाळासाहेब पाटील-उदयसिंह उंडाळकरांच्या जिल्हा बँकेतील भवितव्याचा फैसला आज
Balasaheb Patil, Udaysinh patilsarkarnama

कराड : साऱ्या राज्याचे लक्ष लागलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निकाल अगदी काही वेळातच हाती येणार आहे. त्यामुळे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil)-आणि अॅड. उदयसिंह उंडाळकर (Udaysinh patil-undalkar) यांच्यापैकी जिल्हा बँकेत कोणाचा झेंडा असणार याचा फैसला थोड्याच वेळात होणार आहे. कऱ्हाड सोसायटी गटात रविवारी शांततेत १०० टक्के मतदान झाले आहे.

सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीसाठी कऱ्हाड सोसायटी गटातुन खुद्द राज्याचे सहकार खाते ताब्यात असलेले बाळासाहेब पाटील उभे आहेत. तर त्यांच्या विरोधात दिवंगच माजी सहकारमंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांचे पुत्र अॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यांनी उमेदवारी घेतली होती. त्यामुळे सुरुवातीपासूनच ही लढाई प्रतिष्ठेची बनली आहे. निवडणूकीसाठी रविवारी १०० टक्के मतदान झाले असून मतदारांनी दिलेला कौल आज होत असलेल्या मतमोजणीतून स्पष्ट होणार आहे.

Balasaheb Patil, Udaysinh patil
जिल्हा बँक निवडणूक : उदयनराजेंकडून पराभवाचा सहकारमंत्री बाळासाहेब पाटील बदला घेणार?

आज सकाळी ८ वाजल्यापासून सातारा येथील सातारा जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनच्या हॉलमध्ये मतमोजणीला प्रारंभ झाला आहे. सध्या मतदान मतपत्रिकेचे गट्ट करण्याचे काम सुरू असून थोड्या वेळात निकाल हाती येणार आहेत.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in