बाळासाहेब मुरकुटे म्हणाले, मुख्यमंत्री ठाकरेंनी मंत्री शंकरराव गडाखांचा राजीनामा घ्यावा...

वंचित बहुजन आघाडीकडून ( Vanchit Bahujan Aghadi ) अहमदनगर ( Ahmednagar ) येथील जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर रस्ता रोको आंदोलन केले. या प्रसंगी भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे ( Balasaheb Murkute ) उपस्थित होते.
Balasaheb Murkute
Balasaheb MurkuteSarkarnama

अहमदनगर : मुळा एज्युकेशन संस्थेत नोकरीला असलेल्या प्रतीक काळे या युवकाने शुक्रवारी (ता. 29) आत्महत्या केली होती. आत्महत्ये पूर्वी त्याने एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केला होता. तसेच एक पत्रही त्याच्या मृतदेहा जवळ आढळून आले होते. यात त्यांने सात व्यक्तीची नावे घेतली होती. यातील चारच जणांना अटक झाली आहे. उर्वरित तीन जणांत गडाख कुटूंबीयांची नावे आहेत. या तीन जणांना अटक व्हावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून अहमदनगर येथील जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर रस्ता रोको आंदोलन केले होते. या प्रसंगी भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे उपस्थित होते. त्यांनी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्यावर टीका केली. Balasaheb Murkute said, Chief Minister Thackeray should resign Minister Shankarrao Gadakh ...

यावेळी बाळासाहेब मुरकुटे म्हणाले, प्रतीक काळे आत्महत्या प्रकरणात पोलिस दबावा खाली आहेत. आत्महत्या करण्यापूर्वी प्रतीक काळे या युवकाने सोशल मीडियावर ऑडिओ-व्हिडीओ क्लिपमध्ये मंत्री शंकरराव गडाख, त्यांच्या पत्नी, तसेच भाऊ विजय गडाख यांचीही नावे घेतली होती. या प्रकरणात मंत्री गडाख यांची पोलिसांनी चौकशी करावी, तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री शंकरराव गडाख यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी बाळासाहेब मुरकुटे यांनी केली.

Balasaheb Murkute
वाळू तस्करांना गडाखांनी मोठे केले :  आ. बाळासाहेब मुरकुटे

मुरकुटे पुढे म्हणाले, मागील वर्षी गडाख कुटुंबातील एका महिलेने आत्महत्या केली होती. त्याचे पुढे काय झाले, यावर पोलिस प्रशासनाने प्रकाश टाकावा आणि प्रतीक काळे आत्महत्या प्रकरणी मंत्री असले म्हणून शंकरराव गडाख यांच्या दबावात न येता कार्यवाही करून चौकशी करावी अशी मागणीही मुरकुटे यांनी केली. यावेळी मोठा जनसमुदाय रास्तारोको आंदोलनात सहभागी झाला होता. वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते संजय सुखदान यांना जलसंधारणमंत्री शंकर यशवंतराव गडाख यांच्याकडून त्रास होत असल्याचा निषेध करून पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. मंत्री गडाख यांच्या वर गुन्हे दाखल करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे.

Balasaheb Murkute
आमदार मुरकुटे, आमदार शिवाजी कर्डिलेंनी पाप केले! 

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष दक्षिण प्रतीक बारसे, उत्तर जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे, जिल्हा महासचिव योगेश साठे, सुरेश कोडलकर, मनोज साळवे, प्रवीण आल्हाट, फिरोज पठाण, संजय जगताप, गौतम पगारे, अमर निरभवणे, डॉ. जालिंदर घिगे, सुमित मकासरे, महेश पाखरे आदींसह जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी सहभागी झाले होते. दरम्यान मोठा पोलिस बंदोबस्त होता. रास्तारोको मुळे एसपी चौकातील चारही प्रमुख दिशांना जाणारी आंतरजिल्हा वाहतूक काही काळ खोळंबली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com