Bageshwar Baba News : राष्ट्रवादीच्या नेत्याचं बागेश्वर बाबाला सोलापूरला येण्याचं निमंत्रण : नेटकरी पडले तु़टून!

Solapur politics : वाद निर्माण झाल्यावर उमेश पाटील यांचे स्पष्टीकरण..
Bageshwar Baba News : Umesh Patil :  Solapur
Bageshwar Baba News : Umesh Patil : SolapurSarkarnama

Solapur News : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आणि सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष उमेश पाटील (Umesh Patil) हे सद्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्याबद्दल अवमानकारक आणि वादग्रस्त विधान केल्याबद्दल संत तुकाराम महाराज अनुयायांच्या मनात प्रचंड संताप आहे, त्या बागेश्वर धामच्या बागेश्वर महाराजांना सोलापुरात आणण्याबद्दलचा घाट घातला आहे, या संदर्भातील पोस्ट सोशल मीडियावर पाटील यांनी व्हायरल केल्यानंतर या नव्या वादाला तोंड फुटले आहे.

Bageshwar Baba News : Umesh Patil :  Solapur
Imtiaz Jalil News : एमआयएमचा पोलिसांवर रोष, पण न्यायालयाचा निर्णय मान्य करणार..

या प्रकरणात उमेश पाटील यांच्यावर नेटकऱ्यांनी टिकेची झोड उठवली आहे. त्यांना ट्रोल केले जात आहे. उमेश पाटील यांनी बागेश्वर महाराज यांच्या भेटीचे दोन फोटो आणि माहिती सोशल मीडियावर व्हायरल केली, त्यांनतर हा वाद उफाळला आहे. पाटील यांच्यावर सडकून टीका करताना नेटकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरही टीका केली आहे.

Bageshwar Baba News : Umesh Patil :  Solapur
Long March; शिंदे-फडणवीस सरकारनं माझा बाप नेला!

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या बागेश्वर धामचे बागेश्वर महाराज यांचे हात जोडून स्वागत केले. असा फोटोही त्यांनी आपल्या फेसबुकवरून पोस्ट केली होती. दरम्यान या पोस्टनंतर उमेश पाटील यांच्यावर नेचकऱ्यांनी टीका केली आहे. काहींनी त्यांचा निषेध ही केला आहे.

हा फोटो त्यांनी आपल्या फेसबुकवर पोस्ट करत त्या खाली "लवकरचं सोलापूर नगरीत बागेश्वर धामचे सरकार धीरेंद्र शास्त्री यांची भेट बागेश्वर महाराज यांनी मला आवर्जून त्यांच्या दरबारी येण्याचे आमंत्रण दिले. धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे बागेश्वर धाम सरकार म्हणून ओळखले जाणारे एक भारतीय महाकाव्य कथाकार आणि बागेश्वर धाम सरकार महाराज म्हणून प्रसिद्ध असलेले हिंदू आध्यात्मिक नेते आहेत. शास्त्री हे भारतातील मध्य प्रदेश राज्यातील छतरपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध धार्मिक तीर्थक्षेत्र बागेश्वर धाम सरकारचे पीठाधीश्वर आहेत" असा उल्लेख केलेली पोस्ट पाटील यांनी आपल्या फेसबुक अकाउंट वरून टाकली आहे. दरम्यान या पोस्टनंतर उमेश पाटील यांच्यावर सर्व स्तरातून टीका होऊ लागली आहे. त्यांचा निषेध ही करण्यात येत आहे.

Bageshwar Baba News : Umesh Patil :  Solapur
'अरे आपण सगळे मुंडे साहेबांचेच लोक, टेन्शन घेऊ नका'

योगायोगाने भेट झाली ;अन्य काही नाही : उमेश पाटील यांचे स्पष्टीकरण-

दिल्लीला माझी आणि बागेश्वर बाबाची योगायोगाने भेट झाली. आपल्या संस्कृतीनुसार मी त्यांना अभिवादन केलं. माझी ओळख सांगितल्यानंतर त्यांनी मला त्यांच्या दरबारात येण्याचे निमंत्रण दिले. मीही त्यांना सोलापूरला येण्याचे निमंत्रण दिले. बस एवढेच झाले. महाराजांची विचारधारणा त्यांच्यासोबत आहे, माझी विचारधारणा माझ्यासोबत आहे. विचारधारा विसंगत असणाऱ्या व्यक्तीशी अभिवादन करायचे नाही, बोलायचे नाही हे कसं होऊ शकतं, अशी उमेश पाटील यांनी 'सरकारनामा'ला प्रतिक्रिया दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com