Bageshwar Baba
Bageshwar BabaSarkarnama

Bageshwar Baba : अखेर बागेश्वर बाबाला उपरती : 'त्या' वक्तव्यावर मागितली माफी..

Bageshwar Baba : अध्यात्मिक सेनेच्या प्रयत्नानंतर अखेर बाबा वठणीवर...

Satara : बाळासाहेबांशी शिवसेनेशी (शिंदे गट) (Shinde Group) संलग्न असणाऱ्या धर्मवीर अध्यात्मिक सेनेच्या पुढाकाराने बागेश्वर धाम सरकार उर्फ पंडीत धीरेंद्र शास्त्री यांच्याकडून संत तुकाराम महाराजांबद्दल करण्यात आलेले वक्तव्य मागे घेण्यात आले असून, वारकरी संप्रदायाकडे क्षमा प्रार्थना केली आहे. सनातन धर्म व वारकरी संप्रदाय यांच्यात समन्वयाचे महत्त्वपूर्ण काम धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे अक्षयमहाराज भोसले यांनी केले आहे.

Bageshwar Baba
Shanti Bhushan Passes Away : माजी कायदे मंत्री तथा ज्येष्ठ वकील शांती भूषण यांचं निधन

"संत तुकाराम महाराज यांना त्यांची पत्नी रोज मारत असे, म्हणून ते देवावर प्रेम करु लागले, अशा प्रकारचं वादग्रस्त विधान धर्मेंद्र शास्त्री ऊर्फ बागेश्वर महाराजांनी केली होते. यावरुन महाराष्ट्रात तीव्र संतापाची लाट उसळली होती. या वक्तव्याचा अक्षयमहाराज भोसले यांनी चांगलाच समाचार घेतला होता.

संत श्री तुकाराममहाराजांचा अपमान कदापी सहन केला जाणार नाही, असा इशारा सुध्दा त्यांनी दिला होता. संतवर्य जिजाई आईसाहेबांबद्दल चुकीचे विधान महाराष्ट्र खपवून घेणार नाही. धीरेंद्र शास्त्रीचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो, असे सुध्दा अक्षयमहाराज भोसले म्हणाले होते.

Bageshwar Baba
Jalna Political News : खोतकरांचे जावई झोल याला अटकपुर्व जामीन मंजूर..

काल अक्षयमहाराज यांनी थेट धीरेंद्र शास्त्री यांच्याशी संपर्क साधून याविषयी चर्चा केली होती. या चर्चेत एकमेकांची मते व भावना जाणून घेण्यात आल्या. त्यानंतर धीरेंद्र शास्त्री हे माफी मागतील असे अक्षयमहाराज भोसले म्हणाले होते. त्यानुसार आज धीरेंद्र शास्त्री यांनी संत तुकाराम महाराजांबद्दल चुकीचे बोलले गेलेले शब्द मागे घेवून संत तुकाराम महाराज मला गुरुस्थानी आहेत असे स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com