Karmala News : बागल भाजपच्या वाटेवर : भाजप नेत्यांना निमंत्रण; मात्र ‘आदिनाथ’ला मदत करणाऱ्या सावंतांचा विसर

काही दिवसांपूर्वी मकाई साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी टेंभुर्णी येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.
Karmala Agricultural Festival
Karmala Agricultural FestivalSarkarnama

करमाळा (जि. सोलापूर) : करमाळा (Karmala) येथे ता. ९ मार्चपासून (कै.) दिगंबरराव बागल (Bagal) कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कृषी महोत्सवाच्या कार्यक्रम पत्रिकेतील भाजप नेत्यांची नावे आणि त्यांनी कार्यक्रमाला लावलेली उपस्थिती पाहता बागल भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा करमाळ्यात रंगली आहे. विशेष म्हणजे एका नेत्याने थेट पक्षात प्रवेश करण्याचे आवतानच बागलांना दिले आहे, त्यामुळे बागल लवकर जय श्रीराम म्हणज भाजपत प्रवेश करतील, असे मानले जात आहे. (Bagal of Karmala on BJP's way)

विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीनंतर राज्यात अनेक घडामोडी घडल्या. मात्र, आपण नेमके कोणत्या पक्षाबरोबर आहोत, याचा धांगपत्ता अद्यापपर्यंत बागल गटाने कुणालाही लागू दिला नाही. शिवसेनेत फूट पडल्यानंतरसुद्धा आपण कोणत्या शिवसेनेबरोबर आहोत, याचाही अंदाज त्यांनी कोणाला येऊ दिला नव्हता. मागील विधानसभा निवडणूक शिवसेनेकडून लढल्यानंतरही झालेला पराभव लक्षात घेऊन बागल गटाने अतिशय सावध पवित्रा घेतल्याचे दिसून येते.

Karmala Agricultural Festival
Raigad News : खालापुरात शिंदे गटाला धक्का : वरिष्ठ पदाधिकारी १५० सहकाऱ्यांसह शिवसेनेत परतले

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर प्राप्त परिस्थितीनुसार बागल गटाने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना या सर्वांबरोबरच सलोख्याचे संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला होता. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मात्र त्यांनी भाजपशी जवळीक साधण्यास सुरुवात केली आहे.  काही दिवसांपूर्वी मकाई साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी टेंभुर्णी येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. रश्मी बागल यांनीही भाजप नेत्यांच्या भेटी घेतल्याची चर्चा होती.

अनेक दिवस पक्षीय भूमिका उघड न करणाऱ्या बागल गटाने कृषी महोत्सवानिमित्त भाजपच्या नेत्यांना आमंत्रित करून एक प्रकारे भाजप प्रवेशाचे संकेत दिले आहेत. सध्या बागल गटाच्या ताब्यात असलेला अदिनाथ सहकारी साखर कारखाना व स्थापनेपासून बागल गटाचे वर्चस्व असलेला श्री मकाई सहकारी साखर कारखाना हे दोन्ही कारखाने अडचणीत आहेत.  शेतकऱ्यांची देणे, कामगारांच्या पगारी, अशा अनेक अडचणी कारखान्यांसमोर आहेत.

Karmala Agricultural Festival
Electricity Supply Cut : माजी मुख्यमंत्र्यांसह भाजप प्रदेशाध्यक्षांचा वीजपुरवठा तोडला : भाजप नेत्याचे कनेक्शन आढळले बेकायदा

आज, रविवारी (ता. १२ मार्च) कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मकाईचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडे हात जोडून  कारखान्यांना मदत करण्याची विनंती केली. बागल गटाच्या कारखान्यासमोरील अडचणी पाहता आणि तालुक्यातील राजकीय परिस्थिती विचारात घेता बागल लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी जाणकारांमध्ये चर्चा सुरू आहे.

या वेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार सचिन कल्याणशेट्टी, विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर,  प्रांताधिकारी ज्योती कदम, तहसीलदार समीर माने यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

Karmala Agricultural Festival
Rohit Patil : राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री कोण असेल? : रोहित पाटलांनी दिले हे उत्तर....

मागील निवडणुकीत आमदार नारायण पाटील यांची उमेदवारी कापून मंत्री तानाजी सावंत यांनी रश्मी बागल यांना शिवसेनेची उमेदवारी दिली. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सावंत आणि बागल यांच्यात  तितकाचा संवाद राहिला नव्हता.  आदिनाथ कारखान्यासाठी तानाजी सावंत यांनी १२ कोटी रुपये दिले आहेत. त्यातून आदिनाथ कारखाना सुरू झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मोळी टाकण्याच्या कार्यक्रमाला रश्मी बागल उपस्थित होत्या. मात्र, माजी आमदार श्यामल बागल, बागल गटाचे नेते दिग्विजय बागल अनुपस्थित होते. तेव्हाच अनेकांना बागल शिंदे गटाबरोबर जाणार नसल्याची शंका आली होती.

Karmala Agricultural Festival
Jalgaon District Bank : आमचाच एक गद्दार झाला; अन्यथा पराभव अशक्य होता : खडसेंनी बोलून दाखवली मनातील खदखद

कृषी महोत्सवाच्या कार्यक्रम पत्रिकेत तानाजी सावंत यांचे कोठेही नाव दिसून आले नाही, त्यामुळे मंत्री तानाजी सावंत यांच्या माध्यमातून बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल  शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. पाच दिवस चालणाऱ्या या कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी भाजपच्या सर्वांधिक नेतेमंडळींना निमंत्रित केल्याचे दिसून येते.

Karmala Agricultural Festival
Deepak Kesarkar : ठाकरेंची शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीने विकत घेतली : दीपक केसरकरांचा हल्लाबोल

कार्यक्रम पत्रिकात नाव असलेले खासदार उदयनराजे भोसले, माजी मंत्री पंकजा मुंडे कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील,  माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार सचिन कल्याणशेट्टी, रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार श्रीकांत भारतीय व श्रेया भारतीय, धैर्यशील मोहिते पाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पत्नी जिजामाला नाईक निंबाळकर व शितलादेवी मोहिते पाटील यांनी उपस्थिती लावली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com