Bachchu Kadu News: ''आम्हाला लालदिव्याची गाडी मिळाली नसली तरी...''; बच्चू कडूंचा शिंदे, फडणवीसांना मिश्किल टोला

Kadu Vs Sanjay Raut : आगामी निवडणुकीत कोण मजबूत कोण पंक्चर आहेत ते समजेलच...
Bachchu Kadu, Devendra Fadnavis, Eknath Shinde
Bachchu Kadu, Devendra Fadnavis, Eknath ShindeSarkarnama

Solapur News : मंत्रिपदासाठी लाईनमध्ये जा आणि उभा राहा या मानसिकतेचा बच्चू कडू नाही, ती लाईनच मी तोडून टाकेल. तसेच मंत्रिमंडळाच्या विस्ताराबद्दल आपल्याला काही माहिती नाही आणि आपण काय भविष्यकार नाही अशी रोखठोक भूमिका मांडतानाच आम्हाला लालदिव्याची गाडी मिळाली नसली तरी आमची दोन पायांची गाडी मजबूत आहे. त्यामुळे आम्ही सर्वत्र फिरत राहणार आहेत अशी मिश्किल टिप्पणीही अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी केली आहे.

प्रहार संघटनने आमदार बच्चू कडू एका कार्यक्रमाच्यानिमित्त सोलापूरला आले होते. यावेळी ते बोलत होते. कडू म्हणाले, आम्हाला लालदिव्याची गाडी मिळाली नसली तरी आमची दोन पायांची गाडी मजबूत आहे. आम्ही सर्वत्र फिरत राहणार आहेत. सोलापूरच्या कार्यकर्त्यांनी स्मार्ट सिटीचा भ्रष्टाचार बाहेर काढावा. आंदोलनाचे गुन्हे दाखल झाले तरी काळजी करू नये. दिव्यांग बांधवासाठी आणि सर्वसामन्यांच्या प्रश्नांसाठी मी स्वत: ४५० गुन्हे अंगावर घेतले आहेत असेही बच्चू कडू (Bachhu Kadu) यावेळी म्हणाले.

Bachchu Kadu, Devendra Fadnavis, Eknath Shinde
Bachhu Kadu : मतदान बॅलेट पेपरवर झाल्यास, लोकांच्या मनातील संभ्रम दूर ; बच्चू कडूंचा रोख कुणाकडे?

बच्चू कडू यांनी ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांच्यावर देखील हल्लाबोल केला. कडू म्हणाले, पंक्चर टायर, आणि पंक्चर आमदार अशी टीका केली जात असली तरी आगामी निवडणुकीत कोण मजबूत कोण पंक्चर आहेत ते समजेलच असा इशाराही यावेळी दिला.

आमदार एकनाथ शिंदे यांच्याबरोबर ज्या ज्या आमदारांनी बंडखोरी केली त्यांच्यावर 50 खोके घेतल्याची टीका होते. पण आता उध्दव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला देतानाच इतरांवर टीका करताना आणि दुसऱ्याला दोष देण्यात आपला पक्ष छोटा होईल असा टोलाही बच्चू कडू यांनी ठाकरेंना लगावला आहे.

गुवाहाटी दौऱ्याबद्दल बोलतानाही त्यांनी सांगितले की, मी जरी गुवाहाटीला गेलो नसतो तरी मविआचे सरकार कोसळलेच असते. कारण हे राजकीय बहुमताचं गणित होते. त्यामुळे एकट्या बच्चू कडूमुळे हे सरकार कोसळले नाही तर सगळ्यांच्या मनात असंतोष होता म्हणून हे मविआचे सरकार कोसळल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे आता उध्दव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला देतानाच इतरांवर टीका करताना आणि दुसऱ्याला दोष देण्यात आपला पक्ष छोटा होईल असा टोलाही त्यांनी ठाकरे गटाला लगावला आहे.

Bachchu Kadu, Devendra Fadnavis, Eknath Shinde
Chinchwad By-Election : ठाकरेंच्या शिवसेनेनंही उमेदवारी अर्ज नेल्यानं आघाडीत उमेदवारीचा सस्पेन्स कायम

सोलापूरच्या विविध प्रश्नांसाठी ॲक्शन प्लॅन करा. चांगल्या कामासाठी गुन्हे अंगावर आले तरी चालतील मात्र, सोलापूरचे प्रश्न सोडवा, असे आवाहन प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी केले. सोलापूरचे अनेक प्रश्न आहेत. आठ आठ दिवस पाणी येत नाही. जड वाहतुकीचा प्रश्न सध्या एेरवणीवर आहे. अनेक बळी जड वाहतुकीमुळे गेले आहेत. सोलापूरच्या कार्यकर्त्यांनी स्मार्ट सिटीचा भ्रष्टाचार बाहेर काढावा. आंदोलनाचे गुन्हे दाखल झाले तरी काळजी करू नये असंही कडू यांनी यावेळी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com