बच्चुभाऊंच्या मदतीमुळे मजुराचा वाचला प्राण, स्वत:च्या गाडीतून रूग्णालयात केले दाखल

मंत्री बच्चु कडु (Bacchu Kadu) यांनी जखमी मजुरांना केलेल्या मदतीचे परिसरात चांगलेच कौतुक होत आहे.
Bacchu Kadu
Bacchu Kadu Sarkarnama

कऱ्हाड : प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक (Prahar Janshakti ) अध्यक्ष व राज्यमंत्री बच्चु कडु (Bacchu Kadu) हे दिव्यांग व गोरगरिबांच्या प्रश्नासाठी झटताना अनेकदा आपण त्यांना बघितले आहे. असाच प्रत्यय पुन्हा एकदा सातारकरांना (Satara) बघायला मिळाला आहे. प्रत्यक्ष आपल्या समोर अपघात झालेल्या जखमींना त्वरित उपचारासाठी आपल्या गाडीतून नेत बच्चु भाऊंनी एका मजुराचा प्राण वाचवला आहे. त्याच्या या मदतीचे सातारा व सांगली परिसरात चांगलेच कौतुक होत आहे.

Bacchu Kadu
किरीट सोमय्यांनी अमरावतीतून कुणावर लावला निशाणा ?

बच्चु कडु हे सातारा व सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. ते सांगली जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यातील एका कार्यक्रमासाठी येताना पुणे-बेंगलोर महामार्गावरील पेठ नाका येथे कोल्हापूरच्या मजूरांच्या वाहनाचा अपघात झाला. यामुळे येथे गर्दी जमलेली होती. यामुळे त्यांनी गर्दी बघून त्यांच्या गाडीचा ताफा थांबवला व काय घडले या परिस्थितीचा आढावा घेतला. अपघात झाला हे कळताच त्यांनी जास्त वेळ न घालवता लगेचच गंभीर जखमी झालेल्या जखमींना आपल्या गाडीतुन थेट रुग्णालयात दाखल केले.

Bacchu Kadu
सरकारी गाडीचा वापर परमबीरसिंहांना पडणार चांगलाच महागात!

कडु हे सांगली जिल्ह्याचा दौरा संपवून साताऱ्याकडे येत असताना पेठ नाका येथे हा अपघात झाल्याचे त्यांना दिसले. अपघात झाल्याने येथे नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. हे बघितल्यावर कडु यांनी स्वत: गाडीच्या खाली उतरून अपघातग्रस्त महिलेची आणि तिच्या पतीची आस्थेवाईकपणे चौकशी केली. येथे जास्त वेळ न घालवता प्रसंगावधान दाखवत लगेचच त्यांनी अपघातात गंभीर जखमी झालेल्या जखमीला आपल्या स्वत:च्या गाडीत बसवले व कराड येथील रूग्णालयात दाखल केले. कडु यांनी वेळीच जखमी मजुराला मदत केल्याने त्वरित उपचार मिळाले व जखमीचा प्राण वाचला आहे.

मजुराच्या वाहनाला एका अज्ञात गाडीने उडवले होते. त्यात ते जखमी झाली होते. या प्रसंगी मंत्री कडु यांनी स्वतःच्या गाडीतुन तत्काळ रूग्णालयामध्ये दाखल केले. स्वतःची मंत्रिपदाची गाडीच मजुरांच्या कुटुंबासाठी दिल्याने त्यांच्या या मदतीची चांगलीच परिसरात चर्चा व कौतुक होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in