बच्चु कडू-रवी राणा वाद चिघळला; माफी मागा अन्यथा..

Bacchu Kadu- Ravi Rana| सोलापुरात प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
Ravi Rana| Bacchu Kadu|
Ravi Rana| Bacchu Kadu|

Bacchu Kadu news सोलापूर : गेल्या काही दिवसांपासून अमरावतीचे आमदार रवी राणा आणि अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांच्यात शाब्दिक चकमकी सुरु आहेत. आरोप-प्रत्यारोपांमुळे दोन्ही गटांमध्ये चांगलीच खळबळ माजली आहे. आमदार रवी राणा हे सातत्याने बिनबुडाचे आरोप करत असल्याचा दावा बच्चु कडू यांच्याकडून करण्यात येत आहे. दोघांमधील वाद शिगेला पोहचलेला असताना आता सोलापुरात प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

सोलापुरात प्रहारच्या कार्यकर्त्यांनी चक्क आमदार रवी राणा यांच्या प्रतिमेचे तिरडीच काढत निषेध नोंदवला आहे. इतकेच नव्हे तर रवी राणांनी वेळीच बच्चू कडूंची जाहीर माफी मागितली नाही तर येत्या १ नोव्हेंबरला अमरावतीमध्ये जाऊन रवी राणा यांचा पुतळा जाळू असा इशारा प्रहारच्या कार्यकर्त्यांनी दिला.

Ravi Rana| Bacchu Kadu|
Kailas Patil यांच्या आंदोलनाचा विमा कंपनीला दणका; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले जप्तीचे आदेश

दरम्यान, शुक्रवारी (२८ ऑक्टोबर) रवी राणांच्या फोटोला प्रहार संघटनेच्या वतीने जोडेमारो आंदोलन करण्यात आले. बच्चू कडू यांच्यार रवी राणा यांनी बिनबुडाचे आरोप केल्याप्रकरणी मलकापूर येथील प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हा उपप्रमुख अजय टप यांच्या नेतृत्वात रवि राणा यांचा फोटो असलेल्या बॅनरला 'जोडे मारो' आंदोलन करीत त्यांचा निषेध करण्यात आला.

रवी राणांनी बच्चू कडू यांच्याबद्दल चुकीचे व कोणताही आधार नसलेले खोटे आरोप केले. गरळ ओकून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला असा आरोप प्रहारच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. याचवेळी मलकापूर येथील तहसील चौकात प्रहारच्या कार्यकर्त्यांनी रवी राणांच्या फोटोला चपलांचा हार घालून जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in