बबनराव पाचपुते झाले ठणठणीत : म्हणाले, दुप्पट वेगाने काम सुरू करतोय

बबनराव पाचपुते ( Babanrao Pachpute ) यांनी त्यांच्या तब्बेती बाबत पसरत असलेल्या अफवांना पूर्णविराम देत महत्त्वपूर्ण वक्तव्य केले.
बबनराव पाचपुते झाले ठणठणीत : म्हणाले, दुप्पट वेगाने काम सुरू करतोय
Babanrao PachputeSarkarnama

श्रीगोंदे ( जि. अहमदनगर ) - राज्यात राजकीय उलथा-पालथ सुरू झाली आहे. महाविकास आघाडीला खिंडार पाडत देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात भाजपचे सरकार आणण्याची तयारी केली आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांबरोबर ज्येष्ठ नेत्यांतही नवी ऊर्जा संचारली आहे. श्रीगोंदे तालुक्यातील भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांची तब्बेत काही दिवसांपासून ठिक नसल्याच्या बातम्या येत होते. मात्र आज बबनराव पाचपुते ( Babanrao Pachpute ) श्रीगोंद्यातील एका कार्यक्रमात दिसले. त्यांनी त्यांच्या तब्बेती बाबत पसरत असलेल्या अफवांना पूर्णविराम देत महत्त्वपूर्ण वक्तव्य केले. त्यामुळे आता राज्यात भाजपचे सरकार आल्यावर पाचपुते यांना मंत्रीपद मिळेल, अशी चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे. ( Babanrao Pachpute said, work is starting at double speed )

बबनराव पाचपुते म्हणाले, "आपली तब्बेत बिघडली होती. आता मी ठणठणीत आहे. सध्या दिंडीत चालतोय, प्रवचनेही देतोय. काळजी करु नका, आता पूर्वीपेक्षा दुप्पट वेगाने काम सुरू करतोय," असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.

Babanrao Pachpute
बबनराव पाचपुते म्हणाले, 'साईकृपा'वर आता गडकरींचा वरदहस्त

ते पुढे म्हणाले की, "काही वर्षांतील राजकारण बदलले आहे हे खरे आहे. मात्र कुणी कसे राजकारण करायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी आत्तापर्यंत श्रीगोंदे तालुक्यात काय केले, असा प्रश्न विचाऱ्यांनाही तालुक्याचा विकास माहिती आहे. मध्यंतरी मी आजारी पडलो. कोरोनात लोकांना वाचवितानाच मलाच कोरोना झाला. रुग्णालयात डॉक्टरांनी मला वाचविण्यासाठी केलेले उपचार नंतर माझ्या शरिरासाठी अडचणीचे ठरले. अर्थात यात डॉक्टरांचा कुठलाही दोष नव्हता. ती परिस्थितीच तशी होती," असे त्यांनी स्पष्ट केले.

Babanrao Pachpute
बबनराव पाचपुते म्हणाले, राजेंद्र नागवडे यांना पैशाची गुर्मी...

"मध्यंतरी माझ्या परिस्थितीविषयी काहींनी वेगळीच चर्चा सुरु केली. काहींनी तर विधानसभेची निवडणूक होईल असे सांगत तयारीही केली. पण मी त्यावेळीही ठणठणीत होतो आणि आताही आहे. पंढरीची पायी वारी पत्नी प्रतिभा यांच्यासह 15 वर्षे झाली न चुकता करतोय. यंदाही आम्ही दिंडीत आहोत. मतदारसंघातील महत्वाच्या कार्यक्रमांना हजेरी लावावीच लागते. मात्र दिंडीत चालतोय. जेवढे शक्य होईल तेवढे चालणार आहोत. डॉक्टरांनी जास्त बोलण्यास बंदी घातली आहे तरीही काल दिंडीत प्रवचन केले. दिंडीत गेलो की सगळे विसरतो. त्यामुळे आता सगळे व्यवस्थित होत असून राज्यात सरकारही आपलेच येणार आहे. सगळेच सोयीचे होत असल्याने आपणही दुप्पट वेगाने कामे सुरु आहेत," असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे मंत्रीपद आणि विधानसभा निवडणूक या दोन्हींसाठी तयार असल्याचे दाखविले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in