बबनराव पाचपुतेंनी मारला उद्धव ठाकरेंना टोमणा : म्हणाले...

श्रीगोंद्यातील भाजपचे आमदार बबनराव पाचपुते ( Babanrao Pachpute ) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) व शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama

श्रीगोंदे ( जि. अहमदनगर ) - राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे काही आमदार घेऊन गुजरातमध्ये गेले आहेत. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर होण्याची चिन्हे आहेत. एकनाथ शिंदे यांना शिवसेनेने गटनेते पदावरून दूर केले आहे. त्यांच्या जागी आशिष चौधरी यांच्याकडे गटनेते पदाची जबाबदारी दिली आहे. अशातच श्रीगोंद्यातील भाजपचे आमदार बबनराव पाचपुते ( Babanrao Pachpute ) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) व शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. ( Babanrao Pachpute criticizes Uddhav Thackeray: He said ... )

माजी मंत्री बबनराव पाचपुते म्हणाले, "राज्यातील महाविकास आघाडी सरकारला घरघर कालच्या ( सोमवार ) विधानपरिषद निवडणूक निकालात लागली होती. घरात बसून सरकार चालत नसते. आता शिवसेनेत फूट पडल्याचे समोर आल्यावर भाजपचे सरकार पुन्हा येणार हे निश्चित आहे. या घडामोडींवर आमचे नेते देवेंद्र फडणवीस हाताळत असून ते काय करतात हे पाहणासाठी वेट करा," असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.

Uddhav Thackeray
बबनराव पाचपुते म्हणाले, 'साईकृपा'वर आता गडकरींचा वरदहस्त

ते पुढे म्हणाले की, "देवेंद्र फडणवीस हे काय करतात याचा अनुभव आघाडी सरकारने यापुर्वी घेतला असून आठवड्यात दोन वेळा त्यांनी आघाडीला दिलेले धक्के असह्य झाले आहेत. आता शिवसेना फुटल्याचे समजते. मुळात मुख्यमंत्री घरात बसून सरकार चालवित होते. त्याचा फायदा त्यांच्या सहकारी पक्षांनी अलगद घेतला. त्यामुळे सेनेची बंडाळी झाली असल्याचे दिसते. आता राज्याला भाजप शिवाय स्थिर व मजबूत सरकार कोणी देवू शकत नसल्याचे वास्तव आहे. लवकरच ते होईल," असा विश्वासही पाचपुते यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com