आदित्य ठाकरेंनी हात उंचावला अन् शिर्डीत शिवसेनेचा लोकसभेचा उमेदवार ठरला?

Shirdi Politics| Shivsena| सदाशिव लोखंडे हे शिंदे गटात सामील झाल्याने शिर्डीत शिवसेनेचा उमेदवार कोण असेल, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होत्या.
Aditya Thackeray
Aditya Thackeray

शिर्डी : आमदार, खासदारांच्या बंडाळीनंतर राज्यात शिवसेनेत (Shivsena) उभी फुट पडली. शिवसेनेचे हे डॅमेज रोखण्यासाठी आता खुद्द युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) मैदानात उतरले आहेत. राज्यभरात शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून ते शिवसैनिकांच्या भेटीगाठी घेत आहेत. या यात्रेनिमित्त त्यांनी शनिवारी (23 जुलै) शिर्डीतील शिवसैनिकांच्या भेटीगाठी घेतल्या.

शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे हे शिंदे गटात सामील झाल्याने शिर्डीत शिवसेनेचा उमेदवार कोण असेल, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होत्या. मात्र आदित्य ठाकरेंचे भाषण सुरु असतानाच शिवसेनेचे माजी मंत्री बबनराव घोलप मेळाव्याच्या ठिकाणी पोहचले आणि त्याचवेळी उपस्थित शिवसैनिकांनी 'भावी खासदार' असा उल्लेख करत जोरदार घोषणाबाजी केली. त्यावर आदित्य यांनीही कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीचं समर्थन करत बबनराव घोलप यांचा हातात हात घेत उंचावला. मात्र उमेदवारी देणे हे माझ्या हातात नसल्याचंही आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलं.

Aditya Thackeray
'...तेव्हा पवारसाहेब, अजितदादा मार्गदर्शक असतीलच; पण निर्णय नवीन पिढी घेईल...'

''साईबाबांनी माझी वाट मोकळी केली. पक्षाचा आदेश आल्यावर पुढे मला कर्तव्यं करायचं ते मी करत राहिल. मी बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक असून 54 वर्ष शिवसेनेत आहे. शिवसेनेचा आदेश पाळणे माझा धर्म आहे. मला जे काम मिळेल ते मी करत राहील, अशी प्रतिक्रीया माजी मंत्री बबनराव घोलप यांनी दिली आहे.

- कोण आहेत बबनराव घोलप?

बबनराव घोलप हे राज्याचे माजी समाज कल्याण मंत्री आणि शिवसेनेचे उपनेते आहेत. बबनराव घोलप यांनी १९८५ मध्ये शिवसेनेतर्फे मशाल या चिन्हावर विधानसभा निवडणूक लढली. त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर १९९० मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. १९९५ मध्ये दुसऱ्यांदा विजयी झाल्यावर शिवसेना- भाजप युती सरकारमध्ये ते समाज कल्याण मंत्री बनले.

2014 मध्ये त्यांची शिवसेनेकडून शिर्डी लोकसभा मतदारसंघात उमेदवारी निश्चित करण्यात आली होती. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर न्यायालयीन अडचणीमुळे त्यांना निवडणूक लढवता आली नाही. त्यांच्याऐवजी ऐनवेळी भाजपाच्या सदाशिव लोखंडेंना शिवसेनेने उमेदवारी दिली. त्यामुळे कोणताही जनसंपर्क नसताना लोखंडे खासदार झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com