बबनराव आवताडे पुन्हा मंगळवेढ्यातील राजकारणाच्या केंद्रस्थानी!

हुरडा पार्टीत राजकीय परिस्थितीवर झालेल्या चर्चेमुळे तालुक्यातील आगामी गणिते बदलण्याची चिन्हे आहेत.
Hurda Party
Hurda Partysarkarnama

मंगळवेढा (जि. सोलापूर) : माजी आमदार दिलीप माने यांच्या फार्म हाऊसवर झालेल्या हुरडा पार्टीला मंगळवेढ्याचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा बॅंकेचे संचालक बबनराव आवताडे यांनी हजेरी लावली. ही हुरडा पार्टी असली तरी जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीवर झालेल्या चर्चेमुळे तालुक्यातील आगामी गणिते बदलण्याची चिन्हे आहेत. आगामी काळात बबनराव आवताडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (ncp) सहभाग वाढण्याची चिन्हे आहेत. (Babanrao Avtade again at the center of politics in Mangalvedha taluka)

आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला राखती आली नाही. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांसह अनेकांनी ताकद लावूनही झालेल्या पराभवामुळे पक्षाची मोठी मानहानी झाली. त्यातच नुकत्याच झालेल्या पदाधिकारी निवडीमध्ये मंगळवेढा तालुक्यातील राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटाला तालुक्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व राखण्यासाठी बबनराव आवताडे हे आपल्याच गटाकडे असावेत, असे वाटते. त्या अनुषंगाने त्यांच्या संपर्क कार्यालयात अनेकांच्या चकरा वाढल्या. मात्र, आतापर्यंत जिल्ह्याच्या राजकारणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेल्या बबनराव आवताडे यांच्या समर्थकांना तालुक्यातील राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचे नेतृत्व करावे, अशी इच्छा आहे.

Hurda Party
गिरीशभाऊंना पुण्याच्या बुधवार पेठेत नेऊन दाखवावे : एकनाथ खडसेंचे प्रत्युत्तर

दरम्यान, आगामी जिल्हा दूध संघ, जिल्हा परिषद व पंचायत समिती, विधान परिषदेची संभाव्य निवडणूक लक्षात घेता सर्व जुन्या नेत्यांनी एकत्र येऊन आपली मोट बांधण्याची तयारी सुरू केली आहे. यामध्ये प्रत्येक तालुक्याची जबाबदारी त्या त्या नेत्यांवर सोपवण्यात आली आहे, त्यामुळे सध्या मंगळवेढ्याची जबाबदारी बबनराव आवताडे यांच्यावरच असल्याचे आजच्या बैठकीवरून स्पष्ट झाले आहे. आगामी काळातील राजकीय घडामोडीत बबनराव आवताडे यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे चित्र सध्या तरी स्पष्ट झाले.

Hurda Party
‘आमचं नवीन ठरलंय’ : संजय मंडलिकांच्या घोषणेने सतेज पाटलांना इशारा

दरम्यान, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी राजीनामा दिल्यानंतर मंगळवेढ्यातील राष्ट्रवादीच्या एका गटाला दीपक साळुंके हे जिल्हाध्यक्ष होतील, अशा आशा लागली होती. मात्र, बळीरामकाका साठे यांनाच खुद्द शरद पवार यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होईपर्यंत जिल्हाध्यपदावर राहण्यास सांगितले आहे. त्यामुळे साळुंके यांना मानणारा मंगळवेढा तालुक्यातील राष्ट्रवादीचा गटदेखील शांत झाला आहे.

Hurda Party
शिवसेना आमदार भाजप खासदाराला म्हणाले, ‘मंत्रिपदासाठी तुमची मोदी-शहांकडे शिफारस करतो’

मंगळवेढा राष्ट्रवादीतील गटबाजी थांबवण्याची विनंती बबनराव आवताडे यांनी 12 डिसेंबर रोजी दीपक साळुंखे यांना केली होती. त्यावेळी त्यांनी ज्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी ही गटबाजी तयार केली आहे, त्यांनीच ही गटबाजी थांबवली पाहिजे, अशी भूमिका मांडली आहे. या गटबाजीवर बबन आवताडे हे एक पर्याय होऊ शकतात, अशी चर्चा तालुक्यातील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in