Karad News: यशवंतरावांच्या नावाचा पुरस्कार हे माझे भाग्यच : श्रीनिवास पाटील

Vijay Divas Samaroh विजय दिवस समारोह समितीतर्फे दिला जाणारा यंदाचा जीवन गौरव यशवंत पुरस्कार खासदार श्रीनिवास पाटील यांना माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
Srinivas Patil, Dilip Walse Patil] Balasaheb Patil
Srinivas Patil, Dilip Walse Patil] Balasaheb Patilsarkarnama

कऱ्हाड : जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण, पी. डी. पाटील यांच्या भुमीत मला विजय दिवस समारोह समितीने यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने देण्यात आलेला जीवन गौरव पुरस्कार हे मी माझे भाग्य समजतो. सर्वसामान्य लोकांच्या केलेल्या कामाच्या आशिर्वादामुळे मला इथपर्यंत पोहचता आले. लोकांच्या कृपेमुळे मला हा पुरस्कार मिळाला. असेच जनतेने प्रेम यापुढेही कायम ठेवावे, असे मत खासदार श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले.

विजय दिवस समारोह समितीतर्फे दिला जाणारा यंदाचा जीवन गौरव यशवंत पुरस्कार माजी राज्यपाल खासदार श्रीनिवास पाटील यांना माजी गृहमंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी ब्रिगेडीयर जेम्स थॉमस यांच्यावतीने मेजर मिश्रा यांनी तर साताऱ्याचे पोलिस अधिक्षक समीर शेख यांच्यावतीने पोलिस उपाधिक्षक डॉ. रणजीत पाटील यांनी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.

त्याप्रसंगी ते बोलत होते. आमदार बाळासाहेब पाटील, विजय दिवस समितीचे प्रमुख कर्नल संभाजीराव पाटील, सचीव अॅड. संभाजीराव मोहिते यांच्यासह समितीचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. खासदार पाटील म्हणाले, जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या सानिध्यात मी वाढलो. पी. डी. पाटील यांनी मला वाढवले, मी त्यांच्यामुळे खासदार झालो. भारतीय सैन्यदलाची शिस्त कऱ्हाडकरांना लावण्यात कर्नल संभाजीराव पाटील यांचे मोलाचे योगदान आहे. मी पुण्याचा कलेक्टर, नागपुरचा आयुक्त म्हणुन काम करुन लोकांची सेवा केली.

Srinivas Patil, Dilip Walse Patil] Balasaheb Patil
NCP : निवडणुकींत ‘राष्ट्रवादी पुन्हा’ हेच गाणं वाजलं पाहिजे... श्रीनिवास पाटील

कर्नल संभाजीराव पाटील यांनी कऱ्हाडला सैन्यदलाची माहिती व्हावी यासाठी विजय दिवस समारोह साजरा केला. त्यांचे योगदान मोठे आहे. श्री. वळसे पाटील म्हणाले, जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांचा वारसा लाभलेल्या भुमीत कर्नल संभाजीराव पाटील यांच्या माध्यमातुन खासदार श्रीनिवास पाटील यांनी देण्यात आलेला पुरस्कार हा मोठा आहे. या पुरस्काराला साजेश काम खासदार पाटील यांनी केले आहे. कर्नल पाटील यांनी सामान्य लोकांनी मिल्ट्रीचे वातावरण कसे असते, त्यांचे जीवन कसे असते हे जवळुन दाखवण्याचे काम केले आहे. त्यांचे समाजासाठीचे, तरुण पिढीसाठीचे योगदान मोठे आहे. स्नेहल राजहंस यांनी सुत्रसंचालन केले. रमेश जाधव यांनी आभार मानले.

Srinivas Patil, Dilip Walse Patil] Balasaheb Patil
Satara Medical College News: मेडिकल कॉलेजचा प्रश्न खासदार श्रीनिवास पाटलांनी मांडला लोकसभेत....

वीर माता, आदर्श माता, विद्यार्थ्यांचा गौरव

वीर माता श्रीमती यशोदाबाई चव्हाण, तळबीड (ता. कऱ्हाड), आदर्श माता बाळुताई ढेबे, (कापील), आदर्श विद्यार्थीनी अमृता पाटील (लाहोटी कन्याप्रशाला कऱ्हाड) तर आदर्श विद्यार्थी सोहेल मुलाणी (वेणुताई चव्हाण कॉलेज, कऱ्हाड) यांचाही मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात करण्यात आला.

Srinivas Patil, Dilip Walse Patil] Balasaheb Patil
Satara News: उदयनराजे म्हणतात, चोरी करणाऱ्यांची बोटे छाटा.. बलात्काऱ्यांचे...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com