
कोल्हापूर : कोल्हापूरमधील सामाजिक कार्यकर्ते विजयसिंह देसाई यांच्या घरावर मध्यरात्री अज्ञात तिघांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. कोल्हापूर शहरातील फुलेवाडी रिंगरोड विजयसिंह देसाई येथे घर आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी ही घटना घडल्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. (Kolahapur Crime news)
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रिंगरोड बोंद्रेनगर याठिकाणी विजयसिंह देसाई यांच्या घरावर मध्यरात्री अडीच वाजता कही अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. हल्लेखोरांनी देसाई यांच्या घराची खिडकी आणि झाडांच्या कुंड्या फोडल्या, दगडफेक करत. धुडगूस घालत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार तब्बल १५ ते २० मिनिटे सुरु होता. ही सर्व घटना सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आली आहे.
हल्लेखोरांच्या आवाजाने परिसरातील नागरिक जागे झाले. नागरिकांनी बाहेर येऊन पहिले असता तिघे अज्ञात देसाई यांच्या घरावर हल्ला करताना दिसले. हल्लेखोरांनी खिडक्या, कुंड्यांची तोडफोड आणि प्रचंड शिवीगाळ करत भोगम पार्क येथील किराणा स्टोअरचीही मोडतोड केली.
हा सर्व प्रकार पाहून नागरिकांनी तात्काळ ही माहिती पोलिसांना दिली. करवीर आणि जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतलं असून या प्रकरणी तपास सुरु केला आहे. १६ मे रोजी विजयसिंह देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेला बॅनर फाडल्यावरून लक्षतीर्थ वसाहतीत राहणाऱ्या दोन जणांवर हल्ला झाला होता. या रागातूनन देसाई यांच्या घरावर हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.