माजी आमदाराचा महावितरण कार्यालयात फाशी घेण्याचा प्रयत्न

भाजपचे ( BJP ) माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे ( Balasaheb Murkute ) यांनी आज नेवासे महावितरण कार्यालयात स्वत:ला गळफास लावून घेण्याचा प्रयत्न केला.
माजी आमदाराचा महावितरण कार्यालयात फाशी घेण्याचा प्रयत्न
महावितरण कार्यालयात गळफास घेण्याचा प्रयत्न करत असलेले माजी आमदार बाळासाहेब मुरकुटेसरकारनामा

अहमदनगर : महाराष्ट्रात महावितरण प्रशासनाकडून सक्तीची थकीत वीज बिल वसुली मोहीम राबविली जात आहे. या विरोधात भाजपचे नेते आंदोलने करत आहेत. नेवासे तालुक्यातील शेतकऱ्यांचे सरास शेतीपंपाची वीज जोडणी महावितरण प्रशासनाकडून खंडित करण्यात येत आहे. या विरोधात भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी आज नेवासे महावितरण कार्यालयात स्वत:ला गळफास लावून घेण्याचा प्रयत्न केला. Attempt by former MLA to hang himself in MSEDCL office

शेतकरी आधीच पावसाने हवालदिलं झाला आहे. यातच वीज बिल सक्तीची वसुली सुरू आहे. या संदर्भात बाळासाहेब मुरकुटे यांनी महावितरण अधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदने देऊनही महावितरण अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने आज माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी नेवासे महावितरण कार्यालयामध्ये जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मुरकुटे यांनी दोरी लावून गळफास घेण्याचा प्रयत्न करताच त्यावेळी त्यांच्या समवेत असलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांना थांबविल्याने अनर्थ टळला.

महावितरण कार्यालयात गळफास घेण्याचा प्रयत्न करत असलेले माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे
बाळासाहेब मुरकुटे म्हणाले, मुख्यमंत्री ठाकरेंनी मंत्री शंकरराव गडाखांचा राजीनामा घ्यावा...

सुरवातीला वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातच वीज प्रश्नाबाबत भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली नेवासे भाजपचे पदाधिकारी हे महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत होते. मुरकुटे यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयात तीन तास ठिय्या आंदोलन केले. नेवासे भाजपचे शिष्टमंडळाने शेतकऱ्यांकडून पाच हजार रुपये न घेता तीन हजार रुपये भरून घ्यावेत ही मागणी केली होती. मात्र यावेळी अधिकाऱ्यांनी या मागणीला केराची टोपली दाखवल्याने संतप्त झालेल्या माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी महावितरण कंपनीच्या कार्यालयातच शेतकऱ्यांच्या वीज तोड प्रकरणी गळफास घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना भाजप कार्यकर्त्यांनी थांबविले. त्यांच्या बरोबर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे हे ही उपस्थित होते. बाळासाहेब मुरकुटे यांचा स्वास रोखल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in