Z.P अध्यक्षांच्या बंगल्यावर हल्ला, मात्र सेटलमेंटची होतेय चर्चा!

पोलिसांनी (Sangli Police) देखील या सर्व प्रकाराबद्दल मौनम् सर्वार्थ साधनम् अशीच भूमिका घेतली असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
Sangli Z.P President Bungalow
Sangli Z.P President BungalowSarkarnama

सांगली : सांगली जिल्हा परिषदेतील (Sangli Z.P ) पदाधिकारी व सदस्यांमधील धुसफूस अखेर चव्हाट्यावर आली. मात्र, त्याचे पर्यवसन सोमवारी (ता.24 जानेवारी) रात्री नऊच्या सुमारास जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यात (Sangli Z.P President Bungalow) तोडफोड व मारहाणीत झाले. यावरून दोन्ही बाजुंनी आरोप-प्रत्यारोप झाले असून, रात्री उशिरापर्यंत विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचे काम सुरू होते. मात्र, गुन्हा काही दाखल झाला नव्हता. आता याप्रकरणी राजकीय दबावातून सेटलमेंटची चर्चा सुरू असल्याची चर्चा आहे.

Sangli Z.P President Bungalow
प्राजक्त तनपुरे म्हणाले, भाजपला आंदोलनाचा अधिकार नाही...

गेले काही महिने जिल्हा परिषदेत धुसफूस सुरू आहे. स्वीय निधी वाटपात अन्याय झाल्यावरून सदस्यांमध्ये असंतोष आहे. तसेच, सर्वसाधारण सभा ऑनलाईन घेण्यास सदस्यांचा विरोध आहे. आज (ता.25 जानेवारी) परिषदेची सर्वसाधारण सभा होती. या सभेवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही सदस्यांनी दिला होता.

सांगली जिल्हा परिषदेच्या इतिहासात बहुदा जिल्हाध्यक्षांच्या बंगल्यावर हल्ला होण्याची ही पहिलीच घटना आहे. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नावाचा हा बंगला आहे. जिल्हा परिषदेतील टेंडर व झेडपी तील वाद इतके विकोपाला गेले की या या बंगल्यावर राडा होण्यापर्यंत मजल गेली.

Sangli Z.P President Bungalow
नाना पटोले पंतप्रधानांबद्दल बोललेले नाहीत, आणि गावगुंड मोदी त्यांनी दाखवला...

सांगली जिल्हा परिषदेत भाजपची पहिल्यांदाच सत्ता आली. राष्ट्रवादी व काँग्रेस येथे विरोधी पक्षात आहेत. मात्र, कार्यकाल संपत असताना पदाधिकारी बदलावरून भाजप अंतर्गतच मोठा वाद उफाळून आला होता. त्याचे पुनर्वसन आता बंगल्यात घुसून हाणामारीपर्यंत गेले आहे. एका शिस्तबद्ध पक्षातील हा गोंधळ भाजप नेतृत्वापुढे एक आव्हान आहे. पोलिसांनी देखील या सर्व प्रकाराबद्दल मौनम् सर्वार्थ साधनम् अशीच भूमिका घेतली असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

Sangli Z.P President Bungalow
Sangli Z.P President BungalowSarkarnama

या घटनेची पोलीससूत्र व दोन्ही बाजूच्या गटांकडून मिळालेली माहिती अशी की, सोमवारी रात्री जिल्हा परिषद अध्यक्षांच्या ‘वसंत’बंगल्यात अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांचे पती नंदकुमार कोरे, दीर राजू कोरे, जि. प. सदस्य रवी तम्मनगौडा आणि इतर काहीजण चर्चा करत बसले होते. रात्री नऊच्या सुमारास बंगल्यात समाजकल्याण सभापती प्रमोद शेंडगे, सदस्य संभाजी कचरे, अरूण बालटे, महिला बालकल्याण सभापती सुनिता पवार यांचे पती सुनिल पवार आणि आरोग्य सभापती आशा पाटील यांचे पती सुनिल पाटील हे बंगल्यात आले. समोरासमोर आल्यानंतर त्यांच्यात जुंपली. वादावादी आणि शिवीगाळ झाली. यावेळी नंदकुमार कोरे, राजू कोरे यांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचा प्रकार घडला. त्यांनीही प्रतिकार करून समजावण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत खुर्च्या फेकल्या, कुंड्या फोडून टाकण्यात आल्या. हा गोंधळ ऐकून बंगल्याभोवती गर्दी झाली. विश्रामबाग पोलिसांना हा प्रकार कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Sangli Z.P President Bungalow
Sangli Z.P President BungalowSarkarnama

दरम्यान, नंदकुमार कोरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, 'वॉटर एटीएमच्या एका टेंडरवरून वाद होता. पाच कोटींचे टेंडर होते. हे टेंडर पुण्याच्या ठेकेदाराने १७ टक्के कमी दराने भरले आहे. मात्र या ठेकेदारास आम्ही जाणीवपूर्वक हे काम देत असल्याचा आरोप केला जात आहे. त्या वादातून हा प्रकार घडला आहे. सभापती शेंडगे यांच्यासह पाचजण रात्री नऊच्या सुमारास बंगल्यात आले. त्यातील काहींनी मद्यप्राशन केले होते. त्यांनी आम्हाला मारहाण, शिवीगाळ करून बंगल्यात तोडफोड केली. जीवे मारण्याची धमकी दिली."

Sangli Z.P President Bungalow
Sangli Z.P President BungalowSarkarnama

सभापती शेंडगे म्हणाले, "अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी निधी वाटपात अन्याय केला आहे. जादा निधी स्वत:कडे ठेवला आहे. वॉटर एटीएमचा ठेका घेण्यासाठी शेवटची सर्वसाधारण सभा ऑनलाईन घेण्याचा घाट घातला आहे. महत्त्वाच्या विषयावर चर्चा घडवून न आणता ऑनलाईन सभेत मंजुरी दिली जाणार होती. ऑनलाईन सभेला आमचा विरोध आहे. त्यामुळे आम्हाला चर्चेसाठी बोलवून घेतले होते. त्यावेळी आम्हाला शिवीगाळ व धक्काबुक्की केली. जीवे मारण्याची धमकी दिली. अध्यक्षांच्या पती व दीरानेच बंगल्यात कुंड्या फोडून तोडफोड केली."

Sangli Z.P President Bungalow
Sangli Z.P President BungalowSarkarnama

नंदकुमार कोरे यांनी पोलिस ठाण्यात आल्यानंतर जबाब दिला, तर पाठोपाठ प्रमोद शेंडगे, सुरेंद्र वाळवेकर, नितीन नवले हे तिघेही तेथे आले. त्यांनी कोरे यांच्याविरोधात तक्रार देणार असल्याचे सांगितले. मात्र, दोन्ही गटांना राजकीय नेत्यांचे वारंवार फोन सुरू होते. त्यामुळे तक्रार दाखल करण्यास उशीर होत होता. अखेर आज मंगळवारी देखील दुपारपर्यंत कोणताही गुन्हा याबाबत दाखल झालेला नाही. त्यातच जिल्हा परिषदेची आजची ऑनलाइन सभा कोरमअभावी तहकूब करण्यात आली. हीच सभा ऑनलाइन की ऑफलाइन यावरून देखील गेले चार दिवस वाद सुरू होता.

Sangli Z.P President Bungalow
Sangli Z.P President BungalowSarkarnama

दरम्यान, पुढील काही काळात या सर्व राडेबाजीवरून राजकारण तापणार आहे. भाजपचे शीर्ष नेतृत्व या बाबत काय निर्णय घेणार? तसेच, पालकमंत्री जयंत पाटील यावर काय भाष्य करणार याबाबत जिल्ह्यात आता उत्सुकता आहे. पण झालेला हा सर्व प्रकार अत्यंत पोरकटपणाचा असून या पदाची शानच गमावली असल्याची चर्चा आहे.

Sangli Police
Sangli PoliceSarkarnama

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com