
Sangali Crime news
सांगली : सांगलीतून (Sangli) धक्कादायक माहिती समोर आली आहे. सांगलीच्या भूसंपादन विभागाच्या उपजिल्हाधिकारी हर्षलता गेडाम यांचा विनयभंग करत हल्ला केला. हर्षलता गेडाम पहाटे जॉगिंगसाठी गेल्या असता काही अज्ञातांनी त्यांचा विनयभंग करत चाकू हल्ला केला. या प्रकरणी सांगलीतील विश्रामबाग पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हर्षलता गेडाम आज पहाटे जॉगिंगसाठी गेल्या होत्या. जॉगिंग करताना मोटारसायकालवरून आलेल्या दोन अज्ञातांनी छेडछाड करत उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दंडाला हात लावून ओढत "चलते का"? असं विचारले. त्यात झालेल्या झटापटीत गेडाम यांनी हात लावणाऱ्या अज्ञाताला लाथ मारून खाली पाडले. तर दूसऱ्याने व्यक्तीने चाकूने गेडाम यांच्यावर हल्ला केला, ज्यामध्ये गेडाम यांच्या हातावर किरकोळ जखम झाली.
सांगलीतील जॉगिंगसाठी विश्रामबागच्या नेमिनाथनगर येथील कल्पद्रुम क्रीडांगणावर भूसंपादन विभागाच्या उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत आहेत. गेडाम यांनी स्वसंरक्षणासाठी प्रतिहल्ला केल्याने दोघांनी तिथून पळ काढला. गेडाम यांची छेडछाड करणाऱ्या अज्ञातांपैकी एकाने 17 मे ला त्यांचा पाठलाग करत छेडछाड करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यावेळी आपण दुर्लक्ष केल्यांचही गेडाम यांनी सांगितलं. पण आज पहाटे त्याच व्यक्तीने गेडाम यांच्यावर हल्ला केला.
घडला प्रकाराबाबत हर्षलता गेडाम यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यामध्ये धाव घेत अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला. मात्र, महिला अधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेमुळे सांगलीत खळबळ उडाली आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.