गोपीचंद पडळकरांसह त्यांच्या भावाविरोधात ॲट्रोसिटीसह फसवणुकीचा गुन्हा

झरे येथील जमीन व्यवहार प्रकरणात शेतकऱ्याची फसवणूक झाल्याची तक्रार
Gopichand padlkar

Gopichand padlkar

sarkarnama

आटपाडी (जि. सांगली) : भारतीय जनता पक्षाचे (bjp) आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि त्यांचे बंधू सांगली जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीचे माजी सभापती ब्रह्मदेव पडळकर यांच्यावर फसवणुकीसह ॲट्रोसिटीचा गुन्हा आटपाडी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. विकलेल्या शेतजमिनीचे पैसे न दिल्याची फिर्याद शेतकरी महादेव अण्णा वाघमारे (रा. झरे, ता. आटपाडी) यांनी दिली आहे. एलसीबीसह आटपाडी पोलिसांनी तपास करून गुन्हा दाखल केला आहे. (Atrocity case filed against Gopichand Padalkar and his brother)

<div class="paragraphs"><p>Gopichand padlkar</p></div>
निर्मला जागडेंच्या विजयाने वेल्ह्याला तब्बल २५ वर्षांनंतर मिळाले दोन संचालक!

पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की झरे येथील ज्येष्ठ शेतकरी महादेव वाघमारे आणि त्यांच्या बहिणीकडून आमदार पडळकर आणि त्यांचे भाऊ ब्रह्मदेव यांनी २००८ मध्ये अकरा एकर शेतजमिनीचा (गट नंबर ६२४, ५५६ व ५५७/१) १० लाख ५० हजार रुपयांचा तोंडी व्यवहार ठरवला होता. या वेळी पडळकर यांनी एक लाख रुपये दिले होते. या तोंडी व्यवहाराचा दस्त २१ मार्च २०११ रोजी झाला होता. त्यावेळी ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे स्टॅम्प ड्यूटी कमी करण्याचे भासवून खरेदी दस्त करतेवेळी फक्त ४ लाख ७५ हजार रुपये दिले. असे एकूण वाघमारे कुटुंबाला ५ लाख ७५ हजार रुपये पडळकर बंधूंनी दिले होते.

<div class="paragraphs"><p>Gopichand padlkar</p></div>
राजकीय हिशेब चुकते करण्यास एकत्र आलेल्या विरोधकांना पवारांनी दाखवला कात्रजचा घाट!

प्रत्यक्षात त्यांचा व्यवहार १० लाख ५० हजार रुपयाला ठरला होता. पडळकर बधू त्यांना ४ लाख ७५ हजार रुपये देणार होते. ते आजअखेर त्यांना देण्यात आलेले नाहीत. या उलट त्यांच्या शेत जमिनीतून गेलेल्या पाईपलाईनचा आणि विहिरीच्या पाण्याचा बळजबरीने बेकायदेशीरपणे वापर चालू ठेवला आहे. अखेर या कुटुंबाने पोलिसांकडे धाव घेऊन पडळकर बंधूंच्या विरोधात ॲट्रोसिटी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आटपाडी पोलिस अधिक तपास करत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in