Miraj : मिरजेत तणावाचं वातावरण, सर्वपक्षीय बंदची हाक; पडळकरांच्या भावाची 'ती' कारवाई वादात

Gopichand Padalkar : '' माझ्या भावानं काहीही चुकीचं काम केलेलं नाही..''
Gopichand Padalkar , Brahmanand Padalkar,Miraj News
Gopichand Padalkar , Brahmanand Padalkar,Miraj NewsSarkarnama

Miraj Band News : सांगलीतील मिरज शहरात मध्यरात्रीच्या सुमारास दुकाने आणि हॉटेल जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली आहेत. यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. तसेच याप्रकऱणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांचे बंधू आणि जिल्हा परिषद सदस्य ब्रह्मानंद पडळकर यांच्यावर बेकायदेशीरपने जागेचा ताबा घेण्याच्या उद्देशाने सात मिळकती पाडल्याचा आरोप देखील स्थानिक नागरिकांनी केला आहे.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू आणि माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी मिरज शहरात जेसीबीच्या साहाय्याने दुकाने आणि हॉटेल पाडण्यात आलेल्या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत. याविरोधात मिरजेत तणावाचं वातावरण असून निषेध म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गट, एमआयएम, आरपीआयसह विविध सामाजिक संघटनांनी मिरज बंदची हाक दिली आहे. यावेळी शहरातून रॅली देखील काढण्यात येणार आहे.

घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून नागरिकांच्या तक्रारीवरून ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह १०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

Gopichand Padalkar , Brahmanand Padalkar,Miraj News
MNS News : मुख्यमंत्री पदासाठी रश्मी ठाकरे यांनी उद्धव यांना आजारी पाडलं ; मनसेचा गौप्यस्फोट

काय आहे प्रकऱण?

मिरजमधील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील हॉटेल वृंदावन समोरील दुकाने आणि त्यामागे असलेल्या झोपडपट्टीच्या जागेचा वाद सुरू आहे. ही जागा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भाऊ ब्रह्मानंद पडळकर यांनी खरेदी केल्याचे सांगण्यात येत आहे. ते सांगली जिल्हा परिषदेचे माजी सभापती आहेत. त्यांनी ही जागा मोकळी करण्यासाठी यापूर्वी अनेकदा प्रयत्न केला होता. परंतू, हा वाद सुरूच राहिला.

शुक्रवारी मध्यरात्री ब्रह्मानंद पडळकर यांनी चार जेसीबी आणि सुमारे दोनशे जणांचा जमाव घेऊन दुकाने आणि हॉटेल पाडण्यास सुरुवात केली. त्यामुळे पडळकर समर्थक,दुकानदार आणि झोपडपट्टीधारकांमध्ये जोरदार वादावादी झाली. यावेळी झालेल्या हाणामारीत मोहम्मद सय्यद हा दुकानदार जखमी झाला. दुकाने हॉटेल पाडल्यानंतर झोपडपट्टीकडे मोर्चा वळविला. यावेळी नागरिकांनी पडळकर यांच्या समर्थकांवर दगडफेक केली.

Gopichand Padalkar , Brahmanand Padalkar,Miraj News
Sharad Pawar: '' ...पण देशाचे गृहमंत्री आता पुजाऱ्यांची जबाबदारीही घेताहेत ! '' ; पवारांची मिश्किल टिप्पणी

'' माझ्या भावानं काहीही चुकीचं काम केलेलं नाही..''

मिरज शहरात रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत दुकाने आणि हॉटेल जेसीबीच्या सहाय्याने पाडली, असा आरोप भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भावावर केला जात आहे. ब्रह्मानंद पडळकर यांनी बेकायदेशीरपने जागेचा ताबा घेण्याच्या उद्देशाने मिळकती पाडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तर तोडण्यात आलेले गाळे बेकायदा होते, माझ्या भावानं काहीही चुकीचं काम केलेलं नाही, असं स्पष्टीकरण आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com