सत्तेतील पक्ष कधी बंद पुकारतात का, आठवले यांचा सवाल

केंद्रीय मंत्री रामदास आठवले ( Ramdas Athavale ) हे आज अहमदनगर ( Ahmednagar ) जिल्हा दौऱ्याला आले होते.
Ramdas Athavale
Ramdas AthavaleSarkarnama

अकोले (अहमदनगर) : केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे आज अहमदनगर जिल्हा दौऱ्याला आले होते. या दौऱ्याची सुरवात त्यांनी राजूरपासून केली. तेथे त्यांनी माजी मंत्री मधुकरराव पिचड यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी अकोले येथे पत्रकारांशी परिसंवाद संवाद साधला. या प्रसंगी त्यांनी भाजपची बाजू घेत महाविकास आघाडीतील नेते व पक्षांवर टीका केली. Athavale's question is whether the ruling parties ever call off

रामदास आठवले म्हणाले, राज्यात सहभागी असणाऱ्या पक्षाने किंवा महा विकास आघाडी सरकारच्या घटकाने सत्तेत असताना राज्यात बंद पुकारणे अयोग्य आहे. सत्तेतील पक्ष कधी बंद पुकारतात का? अशाप्रकारे राज्याला वेठीला त्यांनी धरू नये. आंदोलन काळात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले, तर त्याला जबाबदार कोण? असा त्यांनी सवाल उपस्थित केला.

Ramdas Athavale
रामदास आठवले यांनी सांगितला भाजप-शिवसेना युतीचा फॉर्म्युला...

प्राप्तीकर खात्याच्या कारवाईबाबत त्यांनी पुन्हा एकदा जोराने आपला मुद्दा ठणकावून सांगितला की, स्वायत्त शासकीय विभागांकडून पवार यांच्या नातेवाईकांची चौकशी केली जात असेल आणि त्यांच्याकडे अपेक्षेपेक्षा जास्त स्थावर-जंगम मालमत्ता असेल तर ती चौकशी होऊ शकते आणि जर ते दोषी आढळले नाहीत, तर त्यांना ती दिलासा मिळणारी घटना ठरेल. अशा प्रकारची त्यांनी या छाप्याच्या बाबतची आपली भूमिका मांडली.

मराठा आरक्षणाबाबत ही त्यांना छेडले असता, त्यांनी मराठा, लिंगायत, ब्राह्मण, अल्पसंख्यांक यांना आरक्षण मिळावे यासाठी आपण स्वतः गेली 20 वर्ष आग्रही राहिलो आहोत, असे स्पष्ट करून मोदी सरकार दहा टक्के आरक्षण हे वाढीव स्वरूपात असावे. अशा प्रकारचे केंद्राचे निर्देश असल्याचे सांगून तामिळनाडू राज्यात एकूण 69 टक्के आरक्षण आहे. तर महाराष्ट्रात केवळ 50 टक्के आरक्षण असून ते वाढवण्यास कोणतीही हरकत नाही.

Ramdas Athavale
कांताबाई सातारकरांना पद्म पुरस्कार मिळण्यासाठी रामदास आठवले करणार प्रयत्न

392/83 च्या घटनादुरुस्ती कडे लक्ष वेधून राज्यांना एससी, एसटी यांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा किंवा अन्य समाजाला आरक्षण देण्याचे अधिकार देण्यात आल्याचे त्यांनी पत्रकारांच्या लक्षात आणून दिले. शिवाय गरीब मराठा ज्याचे उत्पन्न हे 8 लाख रुपयांच्या आत असेल, अशांना या सवलतीचा लाभ मिळावा असा केंद्राचा विचार आहे. या वार्षिक उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने ही केंद्र प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेचे स्वागत आरपीआय आठवले गट प्रांतिकचे सरचिटणीस विजय वाकचौरे यांनी केले. त्यानंतर मंत्री आठवले हे अकोले येथील वकील बी. जी. वैद्य व कल्पित वाकचौरे यांच्या जनहित फाउंडेशन व विराजश्री ग्रुपच्या कार्यालयाचे उद्घाटन आठवले यांनी केले.

Ramdas Athavale
प्रकाश आंबेडकरांपेक्षा रामदास आठवले अधिक जवळचे वाटतात

अजित पवारांवर टीका

रामदास आठवले यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांवर केलेली प्राप्तिकर खात्याची कारवाई ही आकस बुद्धीची नाही. त्याचा केंद्राशी कोणताही दुरान्वये संबंध नाही. अनावश्यक संपत्ती व आर्थिक व्यवहाराची अनियमितता याबाबत असणार्‍या प्राप्तिकर विभागाने आपली कारवाई केली. त्यामुळे याचा केंद्राशी दुरान्वयाने संबंध नाही अशी पुष्टी त्यांनी जोडली. मात्र अजित पवार यांच्यावर पाटबंधारे विभागाच्या संदर्भात चौकशी सुरू आहे. जालियनवाला बाग घटनेशी लखिमपूर घटनेशी तुलना करणे अयोग्य आहे आणि एकूणच या प्रकाराबाबत येत्या 11 तारखेचा राज्यात पुकारलेला बंद हा अनाठाई आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com