पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांकडून लाच मागणाऱ्या अधिकाऱ्याला रंगेहात पकडले

Bribe News एकरी चारशे रुपयांची लाच मागितल्याचा आरोप येथील शेतकऱ्यांकडून केला जात होता.
Bribe News
Bribe News

Nagar Bribe News नगर : शेतकऱ्यांकडून शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी लाच मागणाऱ्या कृषी अधिकाऱ्यांसह तिघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. नेवासाचे कृषी सहाय्यक अधिकारी रोहिणी मोरे, ग्राम सेवक आणि ग्राम पंचायतीच्या कर्मचाऱ्यांच निलंबन करण्यात आले आहे. पंचनामे करण्यासाठी एकरी चारशे रुपयांची लाच मागितल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील चिलखेनवाडी इथे हा प्रकार उघडकीस आला आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांकडून एकरी चारशे रुपयांची लाच मागितली जात असल्याचा आरोप येथील शेतकऱ्यांकडून करण्यात आला होता. लाचखोरीचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी या प्रकरणाची दखल घेत संपूर्ण प्रकरणावर कारवाई कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

Bribe News
यापुढे आमच्या वाट्याला गेलात तर...; कडूंचा राणांना थेट इशारा

एका शेतकऱ्याने पंचनामा करण्यासाठी आलेल्या आणि पैसे मागणाऱ्या पथकाचे चित्रीकरण केले आहे. यात या पथकातील कर्मचारी यापूर्वी कोणत्या शेतकऱ्यांकडून पैसे घेतल्याची यादीही दाखवत आहेत. शेतकऱ्याने पैसे देण्या नकार दिल्यानंतर त्या कर्मचाऱ्याने एका महिला अधिकाऱ्याचाही नंबर दिला. शेतकऱ्यांनी संपर्क साधत संबंधित अधिकाऱ्याला हा प्रकार सांगितला असता फोटो काढण्यासाठी आणि इतर खर्चासाठीपैसे घेतले जात असल्याचे अधिकाऱ्याने शेतकऱ्याला फोनवर सांगितल्याचे ऐकू येते.

महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांवर महसूल विभाग कारवाई करतील, पण रोहिणी मोरे यांच्यावर कृषी विभागाकडून शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. त्यांचे निलंबन करण्यात आले असून त्यांची पूर्ण चौकशी केली जाणार आहे. पंचनामे करण्यासाठी जर कोणी पैशाची मागणी करत असतील तर त्यांना माफ केलं जाणार नाही, असही अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com