बाळासाहेब पाटील यांना यशवंतराव चव्हाण भूषण पुरस्कार जाहीर; उद्या मिरज येथे वितरण

या समितीच्यावतीने कै. यशवंतराव चव्हाण Yashwantrao Chavan यांचे कार्य, वैचारिक वारसा Ideological heritage पुढे नेणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने गौरविण्यात येते.
Balasaheb Patil
Balasaheb Patilsarkarnama

सातारा : मिरज येथील यशवंतराव चव्हाण स्मारक समितीच्यावतीने दिला जाणार प्रतिष्ठेचा यशवंतराव चव्हाण भूषण पुरस्कार सहकार मंत्री तथा सातारचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना जाहीर झाला आहे. उद्या (रविवारी) मिरज येथील बालगंधर्व नाट्यगृहात या पुरस्काराचे वितरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती स्मारक समितीचे सचिव विठ्ठलराव पाटील यांनी दिली आहे.

स्मारक समितीच्यावतीने महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व देशाचे उपपंतप्रधान यासह विविध पदांवर काम करून स्वच्छ चारित्र्याचा वस्तूपाठ देशासमोर ठेवणारे धूरंदर नेते यशवंतराव चव्हाण यांचा पुतळा महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर उभारण्यात आला आहे. या माध्यमातून यशवंतराव चव्हाण भूषण पुरस्कार समिती स्थापन करण्यात आली आहे.

Balasaheb Patil
बाळासाहेब पाटील कराडकरांवर ठोकणार अब्रुनुकसानीचा दावा

या समितीच्यावतीने कै. यशवंतराव चव्हाण यांचे कार्य, वैचारिक वारसा पुढे नेणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने गौरविण्यात येते. आतापर्यंत माजी खासदर कल्लाप्पाआण्णा आवाडे, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, कै. आर. आर. पाटील, वाशिमचे चंद्रकांत ठाकरे, कै. विष्णूआण्णा पाटील, कृषी तज्ज्ञ आप्पासाहेब पवार आदींना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

Balasaheb Patil
'शरद पवार आमचा बाप, त्यांच्यासाठी मंत्रीपद गेलेतरी बेहत्तर'

यावर्षीचा पुरस्कार साताऱ्याचे पालकमंत्री तथा सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण उद्या (रविवारी) मिरज येथील बालगंधर्व नाट्यगृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी सांगलीचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री विश्वजित कदम, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल पाटील, आमदार मनोहरराव कदम, अनिल बाबर, शहाजीबापू पाटील, श्रीमती सुमनताई पाटील, मानसिंग नाईक, विक्रम सावंत यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com