आमदार आशुतोष काळेही कोरोना पॉझिटिव्ह

ज्येष्ठ नेते शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्या पाठोपाठ आशुतोष काळेही ( Ashutosh Kale ) कोरोना बाधित आढळून आले आहेत.
Ashutosh Kale
Ashutosh KaleSarkarnama

अहमदनगर - अहमदनगर जिल्ह्यात सध्या कोरोनाची तिसरी लाट आली आहे. यात अनेक राजकीय नेते व त्यांच्या कार्यकऱ्यांनाही कोरोना विषाणूंची लागण होत असल्याचे दिसून आले. यात आता कोपरगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांचा समावेश झाला आहे. आशुतोष काळे नुकतेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांना भेटून आले होते. शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्या पाठोपाठ आशुतोष काळेही ( Ashutosh Kale ) कोरोना विषाणूंनी बाधित आढळून आले आहेत. Ashutosh Kale, who met Pawar, is also a corona positive

आमदार आशुतोष काळे यांनाच नुकताच राज्यमंत्रीपदाचा दर्जा मिळाला या बद्दल त्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन आभार मानत पुढील कार्यासाठी आशीर्वाद घेतला. शरद पवार हे कोरोना बाधित आढळून आले आहे. आशुतोष काळे यांनी आज कोरोना चाचणी केली असता ते कोरोना बाधित आढळून आले.

Ashutosh Kale
आमदार आशुतोष काळे यांना कोरोनाची लागण

असाही योगायोग

आशुतोष काळे हे कोरोना बाधित होण्याची ही दुसरी वेळ आहे. या पूर्वी त्यांनी शिर्डी संस्थानच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारताच दोन ते तीन दिवसांतच ते कोरोना बाधित आढळून आले होते. आताही राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळून आठवडाही उलटत नाही तोच आशुतोष काळे यांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले आहे.

कोरोना बाधित झाल्याची माहिती स्वतः आमदार काळे यांनी सोशल मीडियावरून दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली चाचणी करून घ्यावी व काळजी घ्यावी. श्री साईबाबा व आपणा सर्वांचे आशीर्वाद पाठीशी आहेत त्यामुळे काळजी करण्याचे काही कारण नाही. आपण सर्वांनी आपली काळजी घ्या, असे ट्विट केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com