अशोक गेहलोत म्हणाले, काँग्रेसमुक्तीचे स्वप्न पाहणारे स्वतः नष्ट होतील

देश अभंग राहील, असा विश्वास राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत ( Ashok Gehlot ) यांनी व्यक्त केला.
Ashok Gehlot
Ashok GehlotSarkarnama

Ashok Gehlot : धर्माच्या नावावर निर्माण झालेल्या पाकिस्तानचे दोन तुकडे झाले. बलाढ्य रशियाचे विभाजन झाले. हा ज्वलंत इतिहास आपल्यासमोर असताना, लोकशाही व संविधानाच्या भक्कम पायावर उभ्या असलेल्या भारताचा कारभार धर्माच्या नावावर चालणार नाही. येनकेन प्रकारे देशावरील वर्चस्वासाठी काँग्रेसमुक्त भारताचे स्वप्न पाहणारे स्वतः नष्ट होतील, मात्र देश अभंग राहील, असा विश्वास राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी व्यक्त केला.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सव कार्यक्रमानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी उपमुख्यमंत्री, आमदार छगन भुजबळ होते.

Ashok Gehlot
आधी पत्नी नंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत पॅाझिटिव्ह

गेहलोत पुढे म्हणाले की, संत व समाजसुधारकांची भूमी असलेल्या महाराष्ट्राने देशाला कायम दिशा दिली आहे. दिवंगत भाऊसाहेब थोरात व डॉ. अण्णासाहेब शिंदे यांचे योगदान व कार्य हे नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. सर्वधर्मसमभाव व लोकशाही विचार जपणाऱ्या काँग्रेसमुळे समृद्ध भारताची उभारणी झाली आहे.

आमदार छगन भुजबळ म्हणाले, देशात कोणत्याही पक्षाचा अध्यक्ष निवडीची चर्चा होत नाही मात्र काँग्रेसची होते. याचे कारण त्यांच्या मनातील भीती आहे. पुरोगामी विचाराच्या व सर्वांना सोबत घेऊन जाणाऱ्या काँग्रेसला घराणेशाहीचा नाही तर बलिदानाचा इतिहास आहे.

या वेळी राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष गोविंदसिंग डोटासरा, ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे, माजी मंत्री दिलीप देशमुख, डॉ. सुधीर भोंगळे यांचीही भाषणे झाली.

Ashok Gehlot
मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी घेतला जयपूरला काँग्रेस आमदारांचा क्लास

या वेळी व्यासपीठावर काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, हिरामण खोसकर, राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंदसिंग डोटासरा, उल्हास पवार, सत्यजित तांबे, दुर्गा तांबे, कांचन थोरात, रणजितसिंह देशमुख, इंद्रजित थोरात, शरयू देशमुख, डॉ. जयश्री थोरात, विलास औताडे, शरद आहेर, करण ससाणे, डॉ. राजीव शिंदे, माजी मंत्री शोभा बच्छाव, अनिल आहेर, कल्याण काळे, राजेंद्र नागवडे, उदयसिंह उंडाळकर आदी उपस्थित होते.

आमदार बाळासाहेब थोरात यांनी प्रास्तविक केले. डॉ. सुधीर तांबे यांनी स्वागत केले. नामदेव कहांडळ यांनी सूत्रसंचालन केले. बाबासाहेब ओहोळ यांनी आभार मानले.

Ashok Gehlot
Thorat Vs Vikhe : बाळासाहेब थोरात म्हणाले, जनताच कोणाचा कारभार कसा ते ठरवेल

यांचा झाला गौरव

यावेळी स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांना, हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार डॉ. सुधीर भोंगळे यांना तर सहकारातील नेतृत्व पुरस्काराने माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांना गौरवण्यात आले.

देशमुख यांच्याकडून देणगी

पुरस्कारात मिळालेल्या 1 लाखात चार लाख रुपयांची भर टाकून माजी मंत्री दिलीप देशमुख यांनी संग्राम मतिमंद व मूकबधिर विद्यालयाला पाच लाखांची देणगी दिली.

शुभ संकेत स्मरणात राहील

राष्ट्रीय पक्षाध्यक्षपदाचा अर्ज भरण्याअगोदर झालेला संगमनेरच्या सहकार पंढरीतील कार्यक्रमाचा शुभ संकेत कायम स्मरणात राहील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com