अशोक चव्हाण म्हणाले, राजकीय वॉरला गॅंग वॉर होऊ देऊ नका...

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण ( Ashok Chavan ) आज शिर्डी येथे आले होते.
Pwd Minister Ashok Chavan
Pwd Minister Ashok ChavanSarkarnama

अहमदनगर - राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण ( Ashok Chavan ) आज शिर्डी येथे आले होते. त्यांनी साईबाबांचे दर्शन घेतल्यावर उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला. या प्रसंगी त्यांनी राज्य व देशात सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपाच्या राजकारणावर भाष्य केले. ( Ashok Chavan said, don't let political war become gang war ... )

अशोक चव्हाण म्हणाले, दुःख वाटते सार्वजनिक जीवनामध्ये जे वातावरण दुषित करण्यात आले आहे. ते देश व महाराष्ट्राच्या निश्चितच हिताचे नाही. असे माझे व्यक्तिगत मत आहे. आरोप झाल्यावर प्रत्यारोप होतातच. त्यातून फारसे काही निष्पन्न होत नाही. यात सर्वसामान्य जनतेला हाही स्वारस्य नाही. देशात महागाईचा प्रश्न मोठा आहे. जनहिताची कामे व्हावीत अशी जनतेची अपेक्षा आहे मात्र ज्या पद्धतीने राजकीय वातारण गढूळ करण्याचे काम सातत्याने सुरू आहे, ते योग्य नाही. राजकीय वॉरला गॅंग वॉर होऊ देऊ नका, असे आवाहन मंत्री चव्हाण यांनी केले.

Pwd Minister Ashok Chavan
अशोक चव्हाण, सतेज पाटलांना जे जमलं, ते राष्ट्रवादीला पंढरपुरात का जमलं नाही?

ते पुढे म्हणाले की, लोकशाही मार्गाने निवडून आलेले हे सरकार आहे. विरोधकांनी योग्य पद्धतीने विरोध करावा. खालच्या पातळीवर येऊन ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप होत आहेत. एकमेकांच्या घरापर्यंत जाण्याचा जो प्रकार झाला तो न शोभणारा आहे. अशा प्रकाराला सामान्य माणूस कंटाळला आहे. कायद्याचा वापर विरोधकांवर करणे हे लोकशाहीला मारक आहे.

Pwd Minister Ashok Chavan
मंत्री गडाखांच्या स्वीय सहाय्यकावरील हल्ल्याचा मास्टरमाईंड गजाआड

राज ठाकरेंच्या सभांच्या ठिकाणी जमावबंदी लागू करण्याबाबत ते म्हणाले, सभा घेताना सामाजिक संघर्ष निर्माण होऊ नये. लोकांच्या भावना दुखावता कामा नये, अशा प्रकारच्या अटी घालणे योग्य आहे. लोकशाही मार्गाने आम्ही परवानगी देत आहोत. मात्र व्यासपीठाचा उपयोग राजकीय गोष्टीसाठी करून सामाजिक तनाव निर्माण होणे अयोग्य आहे. त्यातून कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतात. अशा बाबी राज्य सरकार कधीही खपवून घेणार नाही. तुम्ही हनुमानाचे भक्त असाल तर मंदिरात जाऊन हनुमान चालिसा म्हणा. एखाद्याच्या घरात जाऊन हनुमान चालिसा म्हणण्याची काय गरज आहे. यातून धार्मिक भावना भडकविण्याच प्रयत्न होत असल्याचे मंत्री चव्हाण यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com