अशोक भांगरे म्हणाले, स्वस्त धान्य काळा बाजार प्रकरणातील सूत्रधार शोधा...

अकोले तालुक्यातील आदिवासीसाठीचे स्वस्त धान्य काळ्या बाजारात जात असलेला ट्रक भाजपच्या ( BJP ) कार्यकऱ्यांनी पकडला होता. हा ट्रक एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( NCP ) कार्यकर्त्याचा असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला होता.
अशोक भांगरे

अशोक भांगरे

सरकारनामा

अकोले ( अहमदनगर ) : अकोले तालुक्यातील आदिवासीसाठीचे स्वस्त धान्य काळ्या बाजारात जात असलेला ट्रक भाजपच्या ( BJP ) कार्यकऱ्यांनी पकडला होता. हा ट्रक एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( NCP ) कार्यकर्त्याचा असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला होता. या प्रकरणी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक भांगरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन स्वस्त धान्य काळा बाजार प्रकरणातील पडद्यामागील सूत्रधार शोधण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. त्यामुळे भांगरे यांनी अकोल्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनाच घरचा आहेर दिल्याची आज तालुक्यात चर्चा आहे. Ashok Bhangre said, find the mastermind behind the cheap grain black market case ...

या प्रकरणातील सत्य उघडकीस यावे. खरे सूत्रधार सापडावेत यासाठी राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोक भांगरे यांनी राज्यातील अन्नधान्य पुरवठा मंत्री व जिल्हाधिकारी यांना निवेदन पाठवून चौकशीची मागणी केली आहे. अकोले येथे नवलेवाडी फाट्यावर 2 नोव्हेंबरला व त्यापूर्वी राजूर येथे 12 मे रोजी काळया बाजारात जाणारे रेशन पोलिसांनी पकडले होते.

<div class="paragraphs"><p>अशोक भांगरे</p></div>
स्वस्त धान्य दुकानांतून चांगल्या प्रतीचेच धान्य वाटप करा ! 

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अकोले तालुक्यातील आदिवासी गोरगरीब जनतेला सरकारी स्वस्त धान्य मिळत नसल्याचा तक्रारी आहेत. हे धान्य काळया बाजारात विकले जात असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. तालुक्यात अलीकडच्या काळात रेशन धान्य चोरीचे दोन तीन प्रकार उघडकीस आले. यात संबंधितांना अटकही करण्यात आली. मात्र या प्रकरणात पडद्या मागील सूत्रधार शोधण्याची गरज आहे. ते शोधले नाही तर यापुढेही हा घोटाळा सुरूच राहील अशी शक्यता आहे.

या प्रकरणात आरोपींना अटक केली असून हे आरोपी नेमके कुणाच्या संपर्कात होते. त्यांच्या मागे कुणाचे पाठबळ होते, ही चौकशी होणे आवश्यक आहे. या प्रकरणाची खोलवर चौकशी करून अहवाल तयार करून पडद्या मागील मुख्य सूत्रधार यांच्यावर कडक कारवाई होणे आवश्यक आहे. मग ते कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते, पुढारी अथवा अधिकारी आहेत. त्यांची या प्रकरणात मोठी साखळी असून या साखळीचा पर्दाफाश करणे मला गरजेचे वाटते.

<div class="paragraphs"><p>अशोक भांगरे</p></div>
अंबड, सिन्नरच्या ट्रक टर्मिनलसाठी उद्धव ठाकरेंना साकडे

आज आदिवासी भागातील गरीब उपेक्षित माणूस रेशंनच्या धान्यावर आपले गुजराण करतात त्यात कोरोना संसर्ग असल्याने रोजगार नाही. त्यामुळे आदिवासी भागातील माणूस मेटाकुटीला आला असताना प्रशासन, कार्यकर्ते यांनी रेशनचे धान्य काळया बाजारात विकण्यासाठी नेत आहे. नवले वाडी फाट्यावर आयशर गाडीतून स्वस्त धान्य नेण्यात येत असताना पकडले मात्र तपासात सूत्रधार कोण, पाठबळ कुणाचे याची चौकशी न झाल्यास कार्यकर्त्यांसह उपोषण करण्याचा इशारा भांगरे यांनी निवेदनातून दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com