"अहमदनगरचे भाजप नेते कमी पडतात म्हणूनच फडणवीसांनी जबाबदारी घेतली"

Ahmadnagar | BJP | NCP : विखे पाटलांच्या मतदारसंघात फडणवीस घालणार लक्ष; घेतली अहमदनगरची जबाबदारी
Radhakrushn Vikhe patil - Sujay Vikhe patil - ram shinde
Radhakrushn Vikhe patil - Sujay Vikhe patil - ram shindeSarkarnama

अहमदनगर : २०२४ च्या निवडणुकांमध्ये स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा लक्ष्य भाजपने ठेवले आहे. या तयारीची पहिली पायरी म्हणून भाजपने आपल्या प्रत्येक महत्वाच्या नेत्यांकडे राज्यातील २ लोकसभा मतदारसंघाची आणि त्या मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी सोपवली आहे. या माध्यमातून त्या नेत्याला मतदारसंघातील पक्षबांधणीपासून, सदस्य नोंदणी, बूथ लेव्हलचा कार्यकर्ता जबाबदारी, स्थानिक राजकीय गणिते, स्थानिक राजकारण अशी सगळी गणित साधत प्रत्येक मतदारसंघ भाजपसाठी मजबूत करण्याचे उद्दिष्ट दिले आहे.

या यादीवर नजर टाकल्यास राज्य भाजपचे नेतृत्व करणारे आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोलापूर आणि अहमदनगर या मतदारसंघांची जबाबदारी आली आहे. त्यामुळे सोलापूरचे भाजप खासदार जयसिद्धेश्वर स्वामी आणि अहमदनगरचे खासदार सुजय विखे पाटील यांच्या मतदारसंघातीच्या बांधणीत आणि प्रत्येक बारीक-सारीक गोष्टीत आता थेट देवेंद्र फडणवीस लक्ष घालणार आहेत. तसेच या दोन लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघात देखील फडणवीसच लक्ष घालणार आहेत.

Radhakrushn Vikhe patil - Sujay Vikhe patil - ram shinde
विखे पाटलांच्या मतदारसंघात फडणवीस घालणार लक्ष; घेतली अहमदनगरची जबाबदारी

दरम्यान फडणवीस यांनी नगरची जबाबदारी घेतल्याच्या बातमीवर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार म्हणाले, अहमदनगर जिल्ह्यातील भाजपचे नेते कमी पडतात म्हणूनच भाजपने 'मिशन- २०२४' अंतर्गत देवेंद्र फडणवीसांकडे नगर जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे. यात पवार यांनी कोणाचेही नाव घेतले नसले तरीही ही टीका म्हणजे भाजपचे माजी मंत्री राम शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे पाटील यांच्यावर असल्याचे बोलले जात आहे.

Radhakrushn Vikhe patil - Sujay Vikhe patil - ram shinde
मुनगंटिवारांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीत काडी टाकली... आग पेटली!

भाजपच्या कोअर कमिटी बैठकीत निर्णय घेतल्याप्रमाणे खालील नेते करणार संपूर्ण राज्यभर दौरा आणि संघटना बांधणी करणार आहेत. या दौऱ्याचं समन्वय भाजपचे संघटनमंत्री श्रीकांत भारतीय (Srikant Bharti) करणार आहेत.

१. देवेंद्र फडणवीस - सोलापूर, अहमदनगर २. चंद्रकांत दादा पाटील - ठाणे ग्रामीण आणि नाशिक

३. सुधीर मुंनगंटीवार - बीड, जालना, ४. पंकजा मुंडे - कोल्हापूर, सांगली

५. आशिष शेलार - रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ६. श्रीकांत भारतीय - नांदेड, परभणी

७. चंद्रशेखर बावनकुळे - अकोला, अमरावती, ८. प्रविण दरेकर - पालघर मिरा भाईंदर

९. गिरीष महाजन - उस्मानाबाद, हिंगोली, १०. संजय कुटे - दक्षिण रायगड,उत्तर रायगड

११. रविंद्र चव्हाण - सातारा, पुणे ग्रामीण, १२. रावसाहेब दानवे - बुलढाणा नंदूरबार

१३. संभाजी पाटील निलंगेकर - गोंदिया, भंडारा, १४. सुधीर मुंनगंटीवार - जालना आणि बीड

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com