Satara : उदयनराजे फडणवीसांना भेटताच... शिवेंद्रसिंहराजेंचा पत्ता कट झाल्याची चर्चा...

Shinde-Fadnavis सरकारचा पहिला विस्तार मंगळवारी (ता. 9) रोजी होण्याची चिन्हे
Shivendraraje Bhosale, Udayanraje Bhosale
Shivendraraje Bhosale, Udayanraje Bhosalesarkarnama

मुंबई : मंत्रिमंडळ विस्तार येत्या एक दोन दिवसांत होण्याची शक्यता असून छोटेखानी विस्तार केला जाणार आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाच्या पाहिल्या पाच मंत्र्यांत पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांच्या नावाचा समावेश आहे. पण, भाजपची यादी जाहीर होण्यापूर्वी एकतासभर आधी खासदार उदयनराजेंनी देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या सागर या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर जाहीर झालेल्या यादीत आमदार शिवेंद्रसिंहराजेंचे नाव नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे शिवेंद्रसिंहराजेंना मंत्रीपद मिळणार का, याची उत्सुकता आता ताणली आहे.

सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली अपात्रतेसंदर्भातील सुनावणी, निवडणूक आयोगापुढील चिन्हासंदर्भात वाद लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तूर्तास मंत्रिमंडळाचा विस्तार छोटेखानी स्वरूपात करण्याचा ठरविले आहे. त्यासंदर्भात या दोघांनी दिल्लीत भाजपश्रेष्ठींशी चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांत ५ ते ७ किंवा जास्तीत जास्त १० आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली जाऊ शकते.

Shivendraraje Bhosale, Udayanraje Bhosale
शिंदेंच्या बंडात काहीही नाही; ही तर दोन वर्षांपासूनची खदखद... उदयनराजे

सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पूर्ण झाल्यानंतरच संपूर्ण मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची भूमिका शिंदे-फडणवीस यांच्यासह भाजपश्रेष्ठींनी घेतल्याची माहिती आहे. मंत्रिमंडळ विस्तार करण्याचे शिंदे-फडणवीस यांनी ठरविले असले तरी तो छोटेखानी म्हणजेच ५ ते ७ किंवा जास्तीत जास्त १० आमदारांनाच मंत्रिपदाची शपथ देण्यात येणार आहे. हा विस्तारही येत्या पंधरा ऑगस्टपूर्वी होण्याची शक्यता वर्तविण्यात येणार आहे.

Shivendraraje Bhosale, Udayanraje Bhosale
सातारचा पालकमंत्री कोण : शिवेंद्रसिंहराजे की शंभूराज देसाई

बंडखोर १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी, यासंदर्भातील सुनावणी सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. त्यामध्ये खुद्द एकनाथ शिंदे यांचा समावेश आहे. तसेच, निवडणूक आयोगाकडेही शिवसेना कोणाची, निवडणूक चिन्हाबाबत वाद दाखल करण्यात आलेला आहे. या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या पाच संभाव्य मंत्र्यांची यादी जाहीर झाली आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांचे नाव दिसत आहे.

Shivendraraje Bhosale, Udayanraje Bhosale
माझ्या ताब्यात 'ईडी' द्या, दाखवतो सगळ्यांना... खासदार उदयनराजे

तर भाजपची यादी जाहीर होण्यापूर्वी आज एक तासाभरापूर्वी खासदार उदयनराजे भोसले यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या सागर या बंगल्यावर जाऊन भेट घेतली होती. दोघात तासभर विविध विषयांवर चर्चाही झाली होती. त्यानंतर भाजपची संभाव्य मंत्र्यांची यादी बाहेर आली. या यादीत साताऱ्याचे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे नाव नसल्याने दिसून आले आहे.

Shivendraraje Bhosale, Udayanraje Bhosale
TET Exam Scam : टीईटी गैरव्यवहारात माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलांचा सहभाग ?

त्यामुळे सातारा, जावळीतील त्यांच्या कार्यकर्त्यांत अस्वस्थता पसरली आहे. भाजपच्या पाहिल्या पाच ते सात मंत्र्यांच्या यादीत शिवेंद्रसिंहराजेंना स्थान मिळण्याची शक्यता होती. पण, त्यांचे नाव यादीत दिसत नसल्याने अनेकांचा उत्साह मावळला होता. त्यांची राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांशी असलेली जवळीक अडचणीची ठरल्याचीही चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com