Satara News : राऊतांचे नाव घेताच नारायण राणे भडकले; म्हणाले, तो डिप्रेशनमध्ये गेलाय...

Narayan Rane मंत्री नारायण राणे यांनी आज खासदार उदयनराजे भोसले यांच्या समवेत जलमंदीर या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला.
Sanjay Raut, Narayan Rane
Sanjay Raut, Narayan Ranesarkarnama

Satara News : संजय राऊतांनी केलेल्या टीकेबाबत विचारले असता केंदीय मंत्री नारायण राणे भडकले. त्या राऊतांचे नाव घेऊ नका. आजपर्यंतचे त्याचे एकही भाकित खरे ठरलेले नाही. कालच्या निकालामुळे हा माणूस डिप्रेशनमध्ये गेलेला आहे. मराठीत अशा माणसाला वेडसर म्हणतात. तर इंग्रजीत त्याला हाप मॅड हा शब्द आहे, अशा शब्दात त्यांनी खासदार संजय राऊत यांची खिल्ली उडवली.

मंत्री नारायण राणे Narayan Rane यांनी आज खासदार उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale यांच्या समवेत जलमंदीर या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मंत्री भागवत कराड, माजी आमदार आनंदराव पाटील आदी उपस्थित होते.

ते म्हणाले, राऊतांचे नाव घेऊ नका. आजपर्यंतचे त्यांचे एकही भाकित खरे ठरलेले नाही. १६ आमदार निलंबित होणार असे तो म्हणत होता. हा माणूस डिप्रेशनमध्ये गेलेला आहे. मराठीत अशा माणसाला वेडसर म्हणतात. इंग्रजीत त्याला हाप मॅड हा शब्द आहे. ज्याचा देशाला व समाजाला उपयोग नाही, त्याने शिवसेनेला संपविले, असा टोला ही लगावला.

Sanjay Raut, Narayan Rane
Sanjay Raut News : राऊतांचा विधानसभा अध्यक्षांना इशारा; म्हणाले,''९० दिवसांत निर्णय घेतला नाही तर...''

ज्यांनी स्वत: राजीनामा देऊन मुर्खपणा केला, त्यांनी सरकारने राजीनामा द्या, म्हणणे मूर्खपणाचे आहे. निवडणुकीत मंगळसूत्र भाजपचे घातले आणि निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदासाठी शरद पवारांचा हात धरुन गेला.

Sanjay Raut, Narayan Rane
Narayan Rane News : साताऱ्यात आयटी कंपन्या आणणार : नारायण राणेंचा उदयनराजेंना शब्द

आता २०२४ पर्यंत आम्हाला वेळ आहे. त्यामुळे नैतिकता नसलेल्या माणसाने आमच्यावर बालू नये. गप्प घरातच बसावे, मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्या असे म्हणण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

Sanjay Raut, Narayan Rane
Satara News : राज्यपालांचा महाबळेश्‍वर दौरा पुढे ढकलला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com