मोदींचा फोटो अरब देशांच्या कचरा कुंडीवर लागल्यावर रोहित पवार म्हणाले...

पंतप्रधान मोदींचा फोटो लावण्यात आला. यावर आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी आपले मत ट्विटरद्वारे व्यक्त केले.
मोदींचा फोटो अरब देशांच्या कचरा कुंडीवर लागल्यावर रोहित पवार म्हणाले...
Rohit PawarSarkarnama

अहमदनगर - भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी एका चर्चे दरम्यान इस्लामबाबत आक्षेपार्ह टिपण्णी केली होती. त्या वक्तव्याचा मुस्लीम समुदायाने आक्षेप घेऊन निषेध केला. काही देशांमध्ये भारतीय उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन सोशल मीडियाद्वारे होत आहे. अरब देशांमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आखाती देशांतील कचराकुंड्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांचा फोटो लावण्यात आला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी आपले मत ट्विटरद्वारे व्यक्त केले. ( As soon as Modi's photo was posted on Arab landfill, Rohit Pawar said ... )

मागील दोन वर्षांपासून महाविकास आघाडी व भाजपत आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. यातच नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यामुळे आरोप-प्रत्यारोपांना नवा मुद्दा मिळाला आहे. नुपूर शर्मा यांच्या आडून रोहित पवार यांनी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनाही टीकेचे लक्ष्य केले आहे.

Rohit Pawar
मी पंतप्रधान नाहीच, केवळ १३० कोटी जनतेचा प्रधानसेवक : नरेंद्र मोदी

रोहित पवार यांनी म्हंटले आहे की, राजकीय विरोधक असले तरी नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांचा फोटो वाईट पद्धतीने पाहण्याची वेळ भाजपच्या मोकाट प्रवक्त्यांनी आणलीय. तसंच आखातातील भारतीयांची अडचण होत असून भारतीय मालावर बहिष्कार टाकला जातोय. हा देशाचा अवमान असून यामुळं प्रत्येक भारतीय संतप्त आहे.

Rohit Pawar
प्रवीण दरेकरांच्या टीकेला रोहित पवारांनी दिले सडेतोड उत्तर : म्हणाले...

त्यांनी पुढे म्हंटले आहे की, विशेष म्हणजे राज्यातही असे अनेक बेताल लोक आहेत. किंबहुना त्यांच्या या 'लाय...'मुळंच महाराष्ट्र भाजपने त्यांची भरती केलीय. देशाची मान खाली घालायला लावणाऱ्या या घोषित आणि खालच्या पातळीवर जाऊन गरळ ओकणाऱ्या काही अघोषित प्रवक्त्यांना भाजपने आतातरी वेसण घालावी, असा टोलाही आमदार रोहित पवार यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in