इम्तियाज जलिल येताच नगरमध्ये लागली आग : राजकीय वातावरण तापले

औरंगाबादमधील एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल ( Imtiaz Jalil ) काल ( ता. 18 ) अहमदनगरमध्ये आले होते.
Imtiaz Jalil News in Marathi, Ahmednagar News in Marathi
Imtiaz Jalil News in Marathi, Ahmednagar News in MarathiSarkarnama

अहमदनगर - औरंगाबादमधील एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल काल ( ता. 18 ) अहमदनगरमध्ये आले होते. त्यावेळी एमआयएमकडून जोरदार आतषबाजी करण्यात आली. त्यातील एक फटाका रंगभूवनमध्ये पडल्याने आग लागली. तर भाषणा दरम्यान इम्तियाज जलिलने अहमदनगर शहरातील फेरीवाल्यांबाबत भाष्य केल्याने शहरात राजकीय आगही लागली आहे. ( As soon as Imtiaz Jalil arrived, a fire broke out in the town )

इम्तियाज जलिल हे अहमदनगरमधील सर्जेपुरा भागात ईद मिलन, शिरखुरमा पार्टी निमित्त काल रात्री आले होते. ज्या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्याच ठिकाणी इम्तियाज जलील यांच्या आगमनाच्या वेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. तिथे जवळ असलेल्या महापालिकेच्या रंगभवन या इमारतीच्या छतावर फटाक्याचा थिनग्या पडल्याने आग लागली. (Imtiaz Jalil Latest News in Marathi)

Imtiaz Jalil News in Marathi, Ahmednagar News in Marathi
चंद्रकांत पाटील आणि इम्तिआज जलिल यांचे हातात हात घालून काम  : मुश्रीफांचा टोला

बंद असलेल्या या रंगभूवनमध्ये असलेल्या कचऱ्याला आग लागली होती. अचानक लागलेल्या या आगीमुळे सर्वांचे लक्ष त्या आगीकडे गेले आणि काही वेळातच ही आग विझवण्यात आली. इम्तियाज जलील यांनी भाषणाची सुरुवातच या लागलेल्या आगी पासून केली.

इम्तियाज जलिल म्हणाले, मी जिथे जिथे जातो तिथे आग लागते. मी भाषणाला सुरुवात अजू केली नाही तेच आग लागली. आता मी काय करू, असे म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला.

Imtiaz Jalil News in Marathi, Ahmednagar News in Marathi
पब्लिसीटीस्टंटला नव्हे मी शहर विकासाला महत्त्व देतो - आमदार संग्राम जगताप

अहमदनगर शहरातील मुख्य बाजार पेठेतील फेरीवाल्यांबाबत ते म्हणाले, कायद्याच्या नावाखाली ज्यांचा रोजगार काढून घेतला गेला आहे. मी येथील प्रशासनाला आव्हान देतो की, पुन्हा असा प्रकार केला तर मी स्वतः येथे येईल. गरिबीची जात अथवा धर्म नसतो. कोणी जर समजत असेल की बळाचा वापर करून कोणत्या नेत्याच्या सांगण्यावरून रोजगार काढून घेतला जाऊ शकतो. तर मी अशा सर्व नेत्यांना सांगू इच्छितो की, त्या सर्व नेत्यांनी एका बाजूला उभे रहावे. मी एका बाजूने उभा राहील, असे आव्हानच त्यांनी अहमदनगर शहरातील नेत्यांना दिले.

Imtiaz Jalil News in Marathi, Ahmednagar News in Marathi
जे मध्यप्रदेशाच्या शिवराजसिंहांना जमले ते महाविकास आघाडी सरकारला जमले नाही...

राष्ट्रवादीच्या जहागिरदरांनी सुनावले

शहरातील मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमणाच्या प्रश्नावरून मोठा वाद झाला होता. या वादावर इम्तियाज जलिल यांनी वक्तव्य केल्याने शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे साहेबान जहागिरदार यांनी सांगितले आहे की, ज्या पक्षाने वारंवार जातीवाद करून देशाचे वाटोळे केले आहे. ही एमआयएम म्हणजेच भाजपची बी टीम आहे. इम्तियाज जलिल विकासावर बोलले नाहीत. ते फेरीवाल्यांच्या प्रश्नावर बोलले. त्यांना माहिती नाही की, फेरीवाल्यांचा प्रश्न मिटला आहे. त्या संदर्भात महापालिकेचा ठराव झाला आहे. तरीही जाणून बुजून फक्त नगर शहरातील शांता बिघडवायची हाच त्यांचा हेतू आहे. नगर शहरातील प्रश्न सोडविण्यासाठी येथील आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी सक्षम आहेत. जलिल यांनी त्यांचे घाणेरडे राजकारण औरंगाबाद येथेच करावे. अहमदनगर शहरातील शांतता भंग करण्याची अथवा लुडबूड करण्याची गरज नाही, असे स्पष्ट केले.

Imtiaz Jalil News in Marathi, Ahmednagar News in Marathi
मनसे नेत्यांना अटक करणारी महिला पोलिस लाच घेताना अटक!

मनविसे आक्रमक

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमीत वर्मा यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सुमीत वर्मांनी इम्तियाज जलिल यांना ईमेलद्वारे पत्र लिहून सुनावले आहे. पत्रात म्हंटले आहे की, नगर शहरातील फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाच्या प्रश्नाबाबत आपणांस खूप पुळका असल्याचे समजले. एखाद्या लोकप्रतिनिधीने आपले ठेवावे झाकून अन् दुसऱ्याचे बघावे वाकून अश्या प्रकारे वागणूक करणे चुकीचे आहे. आपल्या संभाजीनगर मतदार संघातील अतिक्रमणा बाबत आपण वेगळी भूमिका घेता आणि आमच्या अंबिकानगर शहरात येऊन वेगळी पोळी भाजता हे कशासाठी ? तुम्हाला लोकांनी तुमच्या मतदार संघाचे नेतृत्व करण्यासाठी तेथील कामं करण्यासाठी निवडून दिले आहे तर आपण इतर ठिकाणी जाऊन उगाच वेगळी दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये.

त्यांनी पुढे म्हंटले आहे की, नगरच्या प्रश्नांचा एवढाच कळवळा आहे तर नगरला अनेक नागरी समस्या आहेत यावर सुद्धा आपण भाष्य करावे. व्यापारी हा कर भरून शासनाला देशाच्या राज्याच्या पर्यायाने आपल्या शहराच्या विकासासाठी हातभार लावत असतो आणि अश्याच व्यापाऱ्यांना जर मुजोर फेरीवाल्यांमुळे कोंडीचा सामना करावा लागत असेल तर संघर्ष अटळ आहे. मग कोणी माईचा लाल का मधे येईना. आपण सर्व गोष्टीची सत्यता तपासून या अतिक्रमण बाबतीत बोलायला हवे एक बाजू पाहून बोलत असाल तर आपण धर्मांध पणाचे पुरस्कर्ते होत आहात आणि याला उत्तर देखील तसेच मिळेल. कृपया आपण आपल्या मतदारसंघातील लोकांना सोय सुविधा देण्यासाठी त्यांची सेवा करण्यासाठी प्रयत्न करावा उगाच दुसरीकडे आपला वेळ वाया घालवू नका, असे त्यांनी पत्रात म्हंटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com