क्वारंटाईन होताच विखेंनी पाहिले मनसोक्त चित्रपट

भाजपचे ( BJP ) ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांना कोरोनाची लागण झाली होती.
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe PatilSarkarnama

शिर्डी ( जि. अहमदनगर ) - अहमदनगर जिल्ह्यातील राजकारणात विखे कुटुंबाचे वर्चस्व राहिले आहे. भाजपचे ( BJP ) ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनावर त्यांनी मात केली. कोरोना उपचार कालावधीतील अनुभव आज त्यांनी सरकारनामा प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. As soon as he was quarantined, Vikhen saw his favorite movie

कोविडच्या दोन्ही लाटेत जिल्ह्यातील 25 हजाराहून अधिक रूग्णांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्वाची भुमिका बजावली. ध्यानीमनी नसताना त्यांनाच कोविडने गाठले. त्याला परतवून लावीत, दहा दिवसांच्या विलिगीकरणानंतर ते आज प्रथमच जनसंपर्कासाठी घराबाहेर पडले. औषधोपचारा बरोबरच नित्याच्या योगा प्राणायाम केला आणि मनसोक्त चित्रपट पाहिले. त्यामुळे कोविडला बाय बाय करणे सोपे झाले. अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

Radhakrishna Vikhe Patil
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, राज्यानेही इंधनावरील शुल्क कपात करावी...

आज सकाळी अकराच्या सुमारास तालुक्यातील पत्रकारां समावेत चहापान व नाश्ता घेऊन विलीगीकरणा नंतरच्या जनसंपर्क मोहिमेला प्रारंभ केला. त्यावेळी त्यांनी कोविड काळातील विलिगीकरणाचा काळ उपस्थित पत्रकारांच्या डोळ्यासमोर उभा केला.

ते म्हणाले, मागील 28 डिसेंबर रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांच्यासह आमच्या सहकारी आमदार मंडळी समवेत, मुंबईत माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांच्या कन्येच्या विवाहसोहळ्यात सहभागी झालो. दुसऱ्या दिवशी माजी मंत्री शिवाजी कर्डिलेंच्या मुलाच्या लग्नाला हजेरी लावली. 30 डिसेंबरला अंगात कणकण वाटू लागल्याने चाचणी केली तर कोविड संसर्गाचे निदान झाले.

Radhakrishna Vikhe Patil
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकलायं...

ते पुढे म्हणाले की, आजवरच्या राजकीय आयुष्यात एकही दिवस गर्दी शिवाय गेला नाही. आता तर सलग दहा दिवस विलिगीकरणात. सौम्य लक्षणे आणि सर्व वैद्यकीय सुविधा सोबत असल्या तरी शेवटी तो कोविड आहे याची जाणीव होत रहायची. योग प्राणायाम करण्यात सकाळचा एक दीड तास जायचा. कामा शिवाय बसण्याची सवय नाही मग करायचे काय असा प्रश्न निर्माण झाला. पहिल्या दिवसापासूनच मग आवडीचे चित्रपट पहायला सुरवात केली. दहा दिवसात अक्षरशः बॅकलॉग भरून काढला.

मतदार संघातील सर्वसामान्य जनता, कार्यकर्ते, पदाधिकारी, मित्रमंडळी यांचे व्हॉटसअपवर सतत मेसेज सुरू असायचे. आधी नगरच्या विखे फाऊंडेशनच्या अतिथीगृहात विलिगीकरणात होते. बरे वाटू लागताच घरी परतलो. त्यातून माझी तब्येत ठणठणीत असल्याचा संदेश गेला. ते दहा दिवस संपले आणि आजपासून पुनश्च हरिओम, असे म्हणत त्यांनी जनसंपर्काला सुरवात केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com