चंद्रशेखर बावनकुळे येऊन जाताच नगरमधील भाजपचे कार्यकर्ते ओबीसी आरक्षणासाठी रस्त्यावर

भाजपचे नेते तथा माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrasekhar Bawankule ) काल ( ता. 18 ) भाजपचे अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांच्या निवासस्थानी आले होते.
Chandrasekhar Bawankule
Chandrasekhar BawankuleSarkarnama

अहमदनगर - भाजपचे नेते तथा माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrasekhar Bawankule ) काल ( ता. 18 ) भाजपचे अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांच्या निवासस्थानी आले होते. त्यावेळी त्यांनी भाजपचे पदाधिकारी व कार्यकऱ्यांना कानमंत्र देताच आज (ता. 19) भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते भर उन्हात रस्त्यावर उतरून ओबीसींच्या प्रश्नावर आंदोलन करताना दिसले. त्यामुळे एवढे दिवस शहरात दुपारी शांत बसणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना नक्की काय झाले, यावर शहरात उलट-सुलट चर्चा रंगली आहे. ( As soon as Chandrasekhar Bawankule came and went, BJP workers in the city took to the streets for OBC reservation )

माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नगरला धावती भेट दिली. शहर भाजपचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांच्या निवासस्थानी ओबीसी मोर्च्याच्या प्रदेश उपाध्यक्षपदी किशोर डागवाले यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी सरचिटणीस अॅड.विवेक नाईक, ओबीसी मोर्चाचे शहर अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, नगरसेवक प्रदीप परदेशी, सागर गोरे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Chandrasekhar Bawankule
चंद्रशेखर बावनकुळे यांनी केतकी चितळेचे कान टोचले!

या प्रसंगी बावनकुळे यांनी सांगितले की, "भाजपच्या काळात विकासाच्या शिखरावर गेलेल्या राज्याला अविकासाच्या वाटेवर या सरकारने नेऊन ठेवले आहे. तीन पक्षांचे सरकार पूर्णपणे अपयशी सरकार ठरले आहे. सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यापेक्षा त्यांच्या अडचणीत भर घालत आहे. राज्यातील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण या सरकारने घालवले तर मराठा समाजालाही हे सरकार आरक्षण देवू शकले नाही. या दोन्ही समाजावर आघाडी सरकारने मोठा अन्याय केला आहे. त्यामुळे आता भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत या निष्क्रिय सरकार विरोधात आवाज उठवावा. नगर मध्ये भाजपाचे काम चांगले चालू आहे. ओबीसी मोर्च्याच्या प्रदेश उपाध्यक्षपदी किशोर डागवाले यांची नियुक्ती पक्षाल बळकटी देणारी ठरेल," असे बावनकुळे यांनी सांगितले. त्यानुसार आज भाजपने शहरात आंदोलन करण्याचे नियोजन केले.

Chandrasekhar Bawankule
इम्तियाज जलिल येताच नगरमध्ये लागली आग : राजकीय वातावरण तापले

राज्य सरकारच्या दिरंगाईमुळे राज्यातील ओबीसी आरक्षण संपुष्टात आल्याच्या निषेधार्थ शहर ओबीसी मोर्चातर्फे आज दिल्लीगेट समोर धरणे आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध केला. शहर ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शहर भाजपचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे बोलत होते. यावेळी ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर डागवाले, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अंजली वल्लाकटी, माजी नगरसेवक नरेंद्र कुलकर्णी, सरचिटणीस सचिन पावले, संजय भागवत, चिन्मय पंडित, युवराज पोटे, रवींद्र बारस्कर, संजय ढोणे, मिलिंद भालसिंग, महेश नामदे, बाबा सानप, ज्योती दांगडे, केसकर कालिंदी, कुसुम शेलार, अमोल निस्ताने, अभिजित दायमा आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

Chandrasekhar Bawankule
जे मध्यप्रदेशाच्या शिवराजसिंहांना जमले ते महाविकास आघाडी सरकारला जमले नाही...

महेंद्र गंधे म्हणाले, "ओबीसी आरक्षणा संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय दिला आहे. राज्य सरकारने केलेल्या दिरंगाईमुळे व चुकीचा इम्पिरीकल डाटा दिल्याने राज्यारील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपले आहे. भाजपने वारंवार या संदर्भात सरकारकडे मागणी केली आहे. आता जर वेळीच सरकारने जागे व्हावे व तातडीने पुन्हा व्यवस्थित हा इम्पिरीकल डाटा सादर करावा. तरच मध्यप्रदेश प्रमाणे राज्यातील ओबीसी समाजाचे 28 टक्के आरक्षण कायम राहील. आगामी काळात होणाऱ्या सर्व निवडणुका जर ओबीसी आरक्षणा शिवाय झाल्या तर भाजप शांत न बसता अधिक आक्रमक भूमिका घेणार," असा महेंद्र गंधे यांनी दिला.

ज्ञानेश्वर काळे यांनी सांगितले की, "मध्यप्रदेशमधील सरकारने काळजीपूर्वक ओबीसी आरक्षणाचा विषय हाताळला. त्यामुळे मध्यप्रदेश मधील ओबीसी समाजाला पुन्हा आरक्षण मिळाले आहे. असे काळजीपूर्वक काम राज्यातील आघाडी सरकारने केले नाहीये. सर्वोच्च न्यायालयाने वारंवार इम्पिरीकल डाटाची मागणी करत आयोगाची स्थापना करण्याच्या सूचना केल्या. मात्र दोन वर्षापासून केवळ वसुलीचेच काम करणाऱ्या या आघाडी सरकारला ओबीसींकडे पाहण्यास वेळच नाहीये. या सरकारला जाग आणण्यासाठी भाजप आता आक्रमक झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

Chandrasekhar Bawankule
राम शिंदे म्हणाले, पक्षानुसार शेतीला पाणी सोडणार आहेत का?

नागरी प्रश्नावर भाजप आक्रमक होणार का?

अहमदनगर शहरात पाणी, रस्ते, स्वच्छता या सह अनेक नागरी समस्या आहेत. महापालिकेतील विरोधी बाकावरील सर्वात मोठा पक्ष असूनही भाजप आंदोलन करताना दिसत नाही. भाजपने आतातरी शहरातील नागरिकांच्या प्रश्नावर सत्ताधाऱ्यांविरोधात आंदोलन करावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com