मंत्री तानाजी सावंतांच्या स्वागतासाठी ३० किलोमीटरमध्ये तब्बल ६५ स्वागत फलक !

तालुक्यातील पेनुर येथे आरोग्य मंत्री सावंत स्थानिकांशी संवाद साधून अडीअडचणी समजावून घेणार असल्याचे नूतन जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांनी सांगितले
Tanaji Sawant
Tanaji SawantSarkarnama

मोहोळ : राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत (Tanaji Savant) हे मंत्री झाल्यानंतर प्रथमच मोहोळ तालुक्यात येत आहेत. त्यामुळे मोहोळकरांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत, मंत्री सावंत यांच्या स्वागताची जिल्हाप्रमुख चरणराज चवरे (Charanraj Chavre) व तालुका प्रमुख प्रशांत भोसले (Prashant Bhosle) यांनी जय्यत तयारी केली आहे. मगरवाडी ते काटी चिंचोली या 30 किलोमीटर अंतरात तब्बल 65 स्वागत फलक लावण्यात आले आहेत. मंत्री सावंत यांनी मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी या दौऱ्याच्या निमित्ताने होत आहे.

Tanaji Sawant
Political Bappa video : सध्याचा घोडेबाजार खच्चीकरण करणारा पण...

तालुक्यातील पेनुर येथे आरोग्य मंत्री सावंत स्थानिकांशी संवाद साधून अडीअडचणी समजावून घेणार असल्याचे नूतन जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांनी सांगितले. मोहोळ येथील शिवसेना कार्यालयाचे उद्घाटन आरोग्य मंत्री सावंत यांच्या हस्ते होणार आहे. तानाजी सावंत हे मंत्री झाल्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते रिचार्ज झाले आहेत. पेनुर, येवती, पापरी, टाकळी सिकंदर, सौंदणे, आढेगाव, तारापूर, रोपळे, तुंगत या गावातील नागरिकांसाठी मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पेनुर ग्रामीण रुग्णालयाची मागणी जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांनी केली आहे.

Tanaji Sawant
'रामराजे, जयकुमार गोरे यांचा जनतेला वेडे बनवण्याचा व्यवसाय!'

या रुग्णालयासाठी लागणारी सुमारे नऊ एकर जागा पेनुर येथे उपलब्ध असून, त्या जागेवर हे रुग्णालय उभारावे अशी मागणी त्यांनी केली आहे. या भागातील आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गाला जोडणाऱ्या रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या रस्त्याचे मजबुतीकरण, खडीकरण व डांबरीकरण करण्यात यावे तसेच पाणंद रस्ते ही तयार करण्यात यावेत अशी मागणी जिल्हा प्रमुख चवरे यांनी केली आहे.

सोलापूर-मुंबई या महामार्गावरील मोहोळ हे मध्यवर्ती ठिकाण आहे. राज्यातून कोठेही जाण्याची सुविधा या ठिकाणावरून आहे. या मार्गावर वारंवार अपघात होतात. गेल्या अनेक वर्षांपासून मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयाचे नूतनीकरण करावे. या रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देऊन नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसेच हे रुग्णालय सध्या तीस खाटांचे आहे त्या ऐवजी ते 50 खाटांचे करावे अशीही मागणी चवरे यांनी केली आहे. ग्रामीण रुग्णालयात अनेक सोयी सुविधा अपुऱ्या आहेत. एखादा मोठा अपघात झाला तर त्यातील गंभीर जखमीला सोलापूरला अधिक उपचारासाठी पाठवावे लागते तो पर्यंत त्याला जीव गमवावा लागतो. त्यासाठी आरोग्य मंत्र्यांनी मोहोळ कडे लक्ष द्यावे अशी अपेक्षा सर्वसामान्य व्यक्त करीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com