जोपर्यंत मी सरकारमध्ये, तोपर्यंत बाबासाहेबांच्या संविधानाला हात लावू देणार नाही

अहमदनगर ( Ahmednagar ) जिल्ह्यातील राजूर ( Rajur ) येथे आज रामदास आठवले ( Ramdas Athavale ) आले होते.
Ramdas Athavale
Ramdas AthavaleSarkarnama

अकोले ( अहमदनगर ) : केंद्रातील सरकार भारताचे संविधान बदलणार आहे असे म्हणत विरोधी पक्षाकडून संविधान वाचवा मोहीम राबविली जात आहे. यावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज महत्त्वाचे वक्तव्य करत विरोधी पक्षांना सुनावले. As long as I am in government, I will not allow Babasaheb's constitution to be tampered with

अहमदनगर जिल्ह्यातील राजूर येथे आज रामदास आठवले आले होते. त्यांचे स्वागत माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या निवास स्थानी करण्यात आले. विविध संघटना, भाजप, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आदिवासी विकास परिषद, सरपंच परिषदेने त्यांच्यातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

Ramdas Athavale
मला या वयात रस्त्यावर उतरायला भाग पाडू नका - मधुकरराव पिचड

यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांनी आठवले यांना प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकऱ्यांनी महाराष्ट्र सरकारने आदिवासींना इतर हक्कात टाकू नये, भंडारदरा जलाशयाचे नाव क्रांतिवीर राघोजी भांगरे नाव द्यावे, रस्ते आदी मागण्याची निवेदने दिली. या प्रसंगी वकील वसंत मनकर, भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजी धुमाळ, भाजपचे तालुका अध्यक्ष सीताराम भांगरे, जिल्हा परिषदेतील गटनेते जालिंदर वाकचौरे, सोनाली नाईकवाडी, सभापती उर्मिला राऊत, दत्ता देशमुख, यशवंत आभाळे, काशिनाथ साबळे, गणपत देशमुख, सी. बी. भांगरे, विजय वाकचौरे, शांताराम संगारे, चंद्रकांत सरोदे, गौतम पवार आदी उपस्थित होते.

या प्रसंगी आठवले म्हणाले, भाजप व मित्र पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करीत आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या पद्धतीने काम चालू आहे. सरकार आदिवासी मागासवर्गीय आरक्षणाला पाठिंबा देणारे आहे. काही लोक राजकीय आकसापोटी सरकार संविधान बदलणार आहे. आरक्षण बदलणार आहे, अश्या अफवा पसरवत आहे मात्र जोपर्यंत मी सरकारमध्ये आहे तोपर्यंत बाबासाहेबांच्या संविधानाला मी हात लावू देणार नाही. त्यामुळे आदिवासी मागासवर्गीयांचे आरक्षण बदलण्याचा प्रश्नच येत नाही, असे उद्गार रामदास आठवले यांनी काढले.

Ramdas Athavale
रामदास आठवले म्हणाले, `त्या`मुळे  तत्त्वांशी तडजोड करावी लागते

आठवलेंनी जागविल्या आठवणी

या प्रसंगी बोलताना मरामदास आठवले यांनी कविता म्हणत भाषण केले. त्यांनी शिर्डी मतदार संघात निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्याची आठवण काढत आठवले म्हणाले, 2009ला शिर्डी मतदारसंघात मी निवडणूक लढविली होती. लोकशाहीत जय पराजय असतो. पराजय पचविण्याची ताकद असली पाहिजे. मधुकर पिचड अनेक वर्षे मंत्री मंडळात होते. त्यांनी आदिवासी विकास विभागात अविस्मरणीय काम केले. ते शरद पवार यांच्या अगदी जवळ होते. मीही जवळ होतो. आणि आज आम्ही दोघेही त्यांच्यापासून लांब आहोत, असे पिचड व त्यांच्यातील साम्य आठवलेंनी आधोरेखीत केले.

ते पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय काम करत आहेत. याचा आम्हाला अभिमान आहे. भंडारदरा जलाशय होताना अनेक आदिवासी विस्थापित झाले. त्यांचे पुनर्वसन होण्याऐवजी त्यांच्या जमिनी महाराष्ट्र सरकार आपल्या नावे करून त्यांना इतर हक्कात टाकत असेल तर आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून हा प्रश्न व विल्सन डॅमचे नाव बदलून क्रांतिवीर राघोजी भांगरे यांचे नाव देण्यासाठी आपण आग्रही राहू, असेही आठवले म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in