दिलीप सोपलांशी संबंधित ‘आर्यन शुगर’ राष्ट्रवादीच्या बजरंग सोनवणेंनी घेतला विकत!

‘विजय शुगर’नंतर ‘आर्यन शुगर’ची विक्री झाल्याने आर्थिक संकटात सापडलेली सोलापूर जिल्हा बॅंक अडचणीतून बाहेर येण्यास मदत होणार आहे.
Bajrang Sonavane-Dilip Sopal
Bajrang Sonavane-Dilip SopalSarkarnama

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मातब्बर नेते, माजी मंत्री दिलीप सोपल (Dilip Sopal) यांच्याशी संबंधित असलेल्या आर्यन शुगर कारखान्याची सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेडून (Solapur) विक्री करण्यात आली. हा कारखाना राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) बीडचे (Beed) माजी जिल्हाध्यक्ष तथा ‘येडेश्वरी ॲग्रो’चे चेअरमन बजरंग बप्पा सोनवणे यांनी ६८ कोटी ६४ लाख रुपयांना विकत घेतला आहे. आर्यन शुगरचा ताबाही आज येडेश्वरी ॲग्रोला देण्यात आला आहे. (Aryan Sugar was bought by Bajrang Sonavane of Beed NCP)

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने माजी मंत्री दिलीप सोपल यांच्याशी संबंधित असलेल्या आर्यन शुगरला (खामगाव, ता. बार्शी, जि. सोलापूर) कर्ज दिले होते. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची ३६० कोटींची येणेबाकी होती. या कारखान्यासह अन्य लोकांकडे कर्ज थकीत राहिल्याने सोलापूर जिल्हा सहकारी बॅंक आर्थिकदृष्ट्या अडचणीत आली होती. जिल्हा बॅंकेचे प्रशासक तथा सहकार विभागाचे अतिरिक्त निबंधक शैलेश कोतमिरे यांच्या काळात ‘आर्यन शुगर’ची विक्री झाली आहे. ‘विजय शुगर’नंतर ‘आर्यन शुगर’ची विक्री झाल्याने आर्थिक संकटात सापडलेली सोलापूर जिल्हा बॅंक अडचणीतून बाहेर येण्यास मदत होणार आहे.

Bajrang Sonavane-Dilip Sopal
शिंदे-फडणवीसांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबतची अडचण महाराष्ट्राला एकदा सांगूनच टाकावी : अजित पवार

बीड जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे चेअरमन असलेल्या येडेश्वरी ॲग्रो प्रॉडक्‍ट्‌सने (आनंदगाव, ता. केज, जि. बीड) हा कारखाना ६८ कोटी ६४ लाख रुपयांना विकत घेतला आहे. आर्यन शुगरचा ताबा आज (ता. ३० जुलै) येडेश्वरी ॲग्रोला देण्यात आला आहे. येत्या गळीत हंगामापासून येडेश्वरी ॲग्रो युनिट नंबर-दोनचा (आर्यन शुगर) भोंगा वाजणार आहे. येत्या गळीत हंगामापासून हा कारखाना सुरू होईल, अशी माहिती येडेश्वरी ॲग्रो प्रॉडक्‍टचे चेअरमन बजरंग सोनवणे यांनी दिली.

Bajrang Sonavane-Dilip Sopal
गिरीश महाजन ‘ॲक्शन मोड’मध्ये : खडसेंना धक्का दिलेल्या जळगाव दूध संघाचे प्रशासकपद चव्हाणांनी स्वीकारले!

आर्यन शुगर या खासगी साखर कारखान्याकडे थकीत असलेल्या रकमेसाठी सोलापूर जिल्हा सहकारी बॅंकेच्या वतीने सरफेसी कायद्यांतर्गत निविदा प्रक्रिया राबवली होती. जवळपास चार वेळा निविदा काढून देखील या कारखान्याच्या विक्रीला प्रतिसाद मिळत नव्हता. पाचव्यांदा निविदा प्रक्रिया काढल्यानंतर येडेश्वरी ॲग्रोने सकारात्मक प्रतिसाद देत हा कारखाना विकत घेतला आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक आर्थिकदृष्ट्या अडचणीत येण्यासाठी इतर थकबाकीदारांसह विजय शुगर व आर्यन शुगर हे दोन कारखाने कारणीभूत मानले जात होते. प्रशासक कोतमिरे यांच्या काळात विजय शुगर व आर्यन शुगर या दोन्ही साखर कारखान्यांची विक्री झाल्याने सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला आता ‘अच्छे दिन’ येण्याची शक्‍यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in